विद्यापीठाच्या वॉचमनकडे प्राध्यापक पदाच्या तीन तीन नोकऱ्या 

हैद्राबाद येथील उस्मानिया युनिव्हर्सिटीतील घटना 

विद्यापीठाच्या वॉचमनकडे प्राध्यापक पदाच्या तीन तीन नोकऱ्या 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

एखाद्या कॉलेज किंवा विद्यापीठाच्या चौकीदाराचे (Watchman of the university) काम गेट बाहेर चौकीदारी करणे, विद्यार्थी वेळेवर येतात का, महाविद्यालयात कुणी बाहेरचा व्यक्ती येत नाहीना हे पाहणे असते. पण जर एखादा चौकीदार त्याचे काम करताना प्राध्यापक (Professor)होण्याची तयारी करत असेल तर, फक्त तयारीच नाही तर या चौकीदाराने प्राध्यापक पदाच्या तीन नोकऱ्याही (Three jobs of professorship)पटकवल्या आहेत. 

हैद्राबाद येथील उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या (Osmania University, Hyderabad)एज्युकेशनल मल्टीमीडिया रिसर्च सेंटर (EMRC) चे 31 वर्षीय नाईट वॉचमन गोल्ले प्रवीण कुमार यांनी ही कामगिरी करून दाखवली आहे.  प्रवीण कुमार यांनी प्राध्यापक पदाच्या दोन सरकारी नोकऱ्या मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तर तिसऱ्या नोकरीसाठी ऑफर लेटरची वाट पाहत आहेत.

प्रविनला पदव्युत्तर शिक्षक पदाचे नियुक्तीपत्र आधीच मिळाले असून जूनियर लेक्चरर च्या अंतिम यादीतही त्याने स्थान मिळवले आहे. तसेच प्रविनला प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणूनही नोकरी मिळण्याची शक्यता असल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.

या नियुक्त्यांसह प्रवीण हा उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना इयत्ता 11 आणि 12 मध्ये शिकवण्यास पात्र होईल. तसेच त्याला 73,000 ते 83,000 रुपयांपर्यंतचे मासिक वेतन पॅकेज मिळेल. प्रवीण तेलंगणातील मंचेरियल जिल्ह्यातील एका छोट्या गावातील आहे. सध्या त्याला 9,000 रुपये पगार मिळतो. प्रवीणकडे नोकरीच्या अनेक ऑफर असल्या तरी तो ज्युनियर लेक्चरर पद स्वीकारणार असल्याचे त्याने एका मुलाखतीत म्हटले आहे.


एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत, प्रवीणने खुलासा केला की सरकारी परीक्षांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून त्याने  शैक्षणिक मल्टीमीडिया रिसर्च सेंटरमध्ये आउटसोर्सिंग कर्मचारी म्हणून रखवालदाराची नोकरी स्वीकारली. यामुळे त्याला अभ्यासासाठी जास्त वेळ मिळाला.