UPSC Result : रुग्णसेवा करतानाच नागरी सेवेचे स्वप्न साकारले! राज्यात पहिली आलेली कश्मिरा आहे डॉक्टर

लहानपणापासून यूपीएससी करण्यासाठी आई प्रेरणा द्यायची. आयपीएस किरण बेदी यांची माहिती आई लहानपणासूनच देत आल्याने लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत होते.

UPSC Result : रुग्णसेवा करतानाच नागरी सेवेचे स्वप्न साकारले! राज्यात पहिली आलेली कश्मिरा आहे डॉक्टर
Dr. Kashmira Sankhe

एज्यूवार्ता न्यूज नेटवर्क

यूपीएससी (UPSC) परीक्षेत राज्यात प्रथम आणि देशात २५ वा क्रमांक मिळवत डॉ. कश्मिरा संखे (Dr, Kashmira Sankhe) लाखो मुलींसाठी प्रेरणादायी ठरली आहे. कश्मिरा ही डॉक्टर असून रुग्णसेवा करतच ती यूपीएससीची तयारी करत होती. कश्मिराला तिच्या यशाचा कानमंत्र विचारल्यावर तिने या यशाचे श्रेय तिच्या आईला दिले आहे.

कश्मिरा ठाण्यातील असून माध्यमांशी संवाद साधताना म्हणाली, लहानपणापासून यूपीएससी करण्यासाठी आई प्रेरणा द्यायची. आयपीएस किरण बेदी यांची माहिती आई लहानपणासूनच देत आल्याने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत होते. या निकालाची मी आशा ठेवली होती. परंतु एवढी मोठी अपेक्षा नव्हती की राज्यात पहिले यईल.

UPSC Result : देशातील शंभर टॉपर्सची नावे पहा एका क्लिकवर, मुलींनी मारली बाजी

कश्मिराने मुंबईतील गव्हर्नमेंट डेन्टल काॅलेजमधून बीडीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच तिने तयारी सुरू केली होती. पुढे डॉक्टर झाल्यानंतर रुग्णसेवा सुरू झाली. पण तेव्हाही तिने प्रयत्न थांबविले नाहीत. यापुर्वी दोनवेळा परीक्षा दिली होती. अखेर तिसऱ्या प्रयत्नात तिने यशाला गवसणी घातली. आता अधिकारी होऊन कुठेही ड्यूटी मिळाली तरी आत्मीयतेने काम करणार आहे, असेही कश्मिराने सांगितले आहे.

दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा 2022 चा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये मुलींनी बाजी मारल्याचे दिसते. पहिल्या २५ क्रमांकांमध्ये चौदा मुलींचा समावेश आहे. तर ९३३ जणांच्या यादीत पहिल्या शंभरात ४० हून अधिक मुली आहेत. 

वर्षभरापूर्वी IPS, पण IAS व्हायचं स्वप्न शांत बसू देईना! सलग दुसऱ्यांदा केली यूपीएससी क्रॅक

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. देशातून इशिता किशोर (Ishita Kishor) हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यानंतर गरिमा लोहिया (Garima Lohia), उमा हरती एन, स्मृती मिश्रा यांचा क्रमांक लागतो. मुलांमध्ये मयूर हजारिका याने प्रथम क्रमांक पटकावला असून तो यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2