वर्षभरापूर्वी IPS, पण IAS  व्हायचं स्वप्न शांत बसू देईना!  सलग दुसऱ्यांदा केली यूपीएससी क्रॅक

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (upsc) मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या निकालात प्रशांतने ५३५  वा क्रमांक मिळवला आहे.

वर्षभरापूर्वी IPS, पण IAS  व्हायचं स्वप्न शांत बसू देईना!  सलग दुसऱ्यांदा केली यूपीएससी क्रॅक
Prashant Dagale

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

यूपीएससी (UPSC) ही देशातील एक प्रतिष्ठीत परीक्षा मानली जाते. ही परीक्षा पास होण्यासाठी अनेकजण वर्षानुवर्षे अभ्यास करत आहेत, तरीही अनेकांच्या पदरी अपयश पडते. परंतु, प्रशांत डगळे (Prashant Dagale) याने सलग दोनदा यूपीएससीची परीक्षा क्रॅक केली आहे. वर्षभरापुर्वी त्याला आयपीएस (IPS) केडर मिळाले होते. प्रशांतला आय़एएस व्हायचे असल्याने त्याने पुन्हा परीक्षा दिली अन् आता तो देशपातळीवरील गुणवत्ता यादीत दुसऱ्यांदा स्थान मिळवले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (upsc) मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या निकालात प्रशांतने ५३५  वा क्रमांक मिळवला आहे. प्रशांतने पुण्यातील इंडियन इंस्टीस्टूट ऑफ सायन्स एज्यूकेशन अॅऩ् रिसर्च या संस्थेतून भौतिकशास्त्रातून पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळविली आहे.

हेही वाचा : जिद्द अन् चिकाटी काय असते ते सागरने दाखवून दिले! पाचव्या प्रयत्नात यशाला गवसणी..

शिक्षण सुरू असतानाच प्रशांतने नागरी सेवेमध्ये जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले. अभ्यासाला सुरूवात केल्यानंतर कोरोनासारख्या महामारीतसुद्धा तो शांत बसला नाही. कोरोनाच्याही काळातही त्याने जिद्दीला पेटून अभ्यास केला.

हेही वाचा : कॉलेजनंतर चहाच्या टपरीवर वडिलांना मदत करणारा मंगेश झाला साहेब!

प्रशांत हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील चिंचवणे या गावचा. त्याचे वडील कृषी खात्यामध्ये गट क मध्ये सेवेत आहेत. तर आई घरकाम करते. प्रशांत पहिल्या प्रयत्नातही परीक्षा पास झाला होता. त्यावेळी त्याला आयपीएस (IPS) पोस्ट मिळाली होती. परंतु त्याची आयएएस(IAS) होण्याची इच्छा असल्याने त्याने दुसऱ्यांदा ही युपीएससीची परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नातही त्याला यश मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2