NEP 2020 : संस्थाचालकांना येणाऱ्या अडचणींवर होणार विचारमंथन

पर्वती दर्शन येथील मुक्तांगण इंग्लिश स्कुलच्या सभागृहामध्ये हे चर्चासत्र होणार असून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

NEP 2020 : संस्थाचालकांना येणाऱ्या अडचणींवर होणार विचारमंथन
NEP 2020 Representative Image

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE) व पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या वतीने शिक्षण (Education) संस्थाचालकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर या चर्चासत्रात शिक्षणतज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

पर्वती दर्शन येथील मुक्तांगण इंग्लिश स्कुलच्या सभागृहामध्ये हे चर्चासत्र होणार असून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला 'एआयसीटीई'चे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि महाराष्ट्र राज्याचे तंत्र व शिक्षण प्र-संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित असणार आहेत.

क्लस्टर विद्यापीठासाठी किमान २ हजार विद्यार्थ्यांचे बंधन ; नियमावली झाली प्रसिध्द

पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संचालक प्रा. राजेंद्र कडुसरकर आणि प्र-प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे उपस्थित होते. या चर्चासत्रात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. डी. कुलकर्णी,  सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, सदस्य डॉ. शैलेश देवळाणकर, डॉ. अनिल राव, डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, महेश दाबक, राम सुब्रमण्यम हे नवीन शैक्षणिक धोरण यशस्वी करण्याच्या दृष्टीने  मार्गदर्शन करणार आहेत.

शिक्षण संस्थाचालक नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना त्यांना येणाऱ्या अडचणी चर्चासत्रात मांडू शकणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षणसंस्था, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व औद्योगिक क्षेत्र यांची महत्वाची भूमिका आहे. या नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करताना येणारी आव्हाने व त्यावर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रेडेकर यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo