विज्ञानाश्रमातर्फे डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरू

'डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी' हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम असून त्यात वर्कशॉप,इलेक्ट्रिकल,फूड प्रोसेसिंग,डेअरी,पोल्ट्री, सौर तंत्रज्ञान, आधुनिक शेती,संगणक आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग यामधील आधुनिक संधी यावर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे.

विज्ञानाश्रमातर्फे  डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पाबळ येथील विज्ञानाश्रमातर्फे (Vigyan Ashram, Pabal ) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंगच्या (National Institute of Open Schooling) मान्यतेने या २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी  'डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी' (DBRT) हा पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे,असे  विज्ञानाश्रमचे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी ( Director of Vigyanashram Dr. Yogesh Kulkarni) यांनी सांगितले. 

'डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी' हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम असून त्यात वर्कशॉप,इलेक्ट्रिकल,फूड प्रोसेसिंग,डेअरी,पोल्ट्री, सौर तंत्रज्ञान, आधुनिक शेती,संगणक आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग यामधील आधुनिक संधी यावर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे.तसेच उद्योग उभारणीसाठी मदत केली जाणार आहे. दहावी ,बारावी उत्तीर्ण /अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतची अधिक माहिती  https://vigyanashram.online/admissions/ या  लिंकवर उपलब्ध आहे. 

हेही वाचा : संशोधन /लेख Education Loan : वैद्यकीय, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज घ्या... राज्य सरकार भरेल व्याज!

ग्रामीण भागात शेती आणि  कृषी आधारित उद्योगांच्या उभारणीसाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्यासाठी या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली असून हाताने काम करण्याच्या सूत्रावर हा अभ्यासक्रम आधारित आहे. या पदविका प्रमाणपत्रानंतर विद्यार्थ्याना बँकेकडून व्यवसाय उभारणी साठी कर्ज मिळवण्यासाठी,उद्योजकता मार्गदर्शन व सहाय्य विज्ञान आश्रमाकडून केले  जाणार आहे. 
-----------------------------------

'डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी '  (DBRT) अभ्यासक्रमाची वैशिष्ठ्ये

-  प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे या पध्दतीवर आधारित शिक्षण पध्दती  
-   अभियांत्रिकी , ऊर्जा आणि पर्यावरण , गृह आणि आरोग्य , शेती आणि पशुपालन  या तील बहुविध कौशल्याचे शिक्षण 
 -   कौशल्य शिक्षणाबरोबर व्यक्तिमत्व विकास, ध्यान, संभाषण कौशल्य, खेळ आदी  उपक्रम 
-   विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध 
-   आदिवासी / शेतकरी / गरजू विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती 
-  मुलींसाठी १००% शिष्यवृत्ती , अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर नोकरी / उद्योजकता मार्गदर्शन 
-  संवादाचे माध्यम : मराठी / हिंदी / इंग्रजी. 
-   पात्रता : वय किमान १५ वर्षे / किमान ८ वी पास, हाताने काम शिकण्याची इच्छा.
-   कालावधी : १ वर्ष, 
-  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे प्रमाणित 
-  अभ्यासक्रम कालावधी: १० जुलै २०२३ ते २५ जून २०२४  
- प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी या लिंक ला भेट द्या : https://vigyanashram.online/admissions/