बारावीचा गणिताचा पेपर फुटला ?
बारावीच्या परीक्षेत गणित विषयाचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत अद्याप राज्य मंडळाकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जात असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गणित विषयाचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत अद्याप राज्य मंडळाकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. एका वृत्तवाहिनीने सोशल मीडियावर गणित विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल झाली असल्याचा दावा केला आहे.
इयत्ता दहावी बारावीच्या प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने राज्य मंडळांनी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय रद्द केला होता. परंतु, सर्व खबरदारी घेऊनही बुलढाण्याच्या सिंदखेडराजा येथून गणित विषयाचे प्रश्नपत्रिका फुटल्याचे बोलले जात आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच अर्धा तास आधी पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच गोंधळ उडाला आहे.
इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका प्रश्न ऐवजी उत्तरे दिल्याचे सुख राज्य मंडळाकडून झाली होती. त्यात आता गणितासारखा महत्त्वाचा पेपर फुटल्याने राज्य मंडळाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.