राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेत एमआयटीची कामगिरी ; पै. अनुदान चव्हाणला रौप्यपदक
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या तालमीचा पैलवान अनुदान अनिल चव्हाण यांनी चमकदार कामगिरी करत रौप्यपदक पटकाविले

ऑलिम्पिक पदक विजेता पै. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या तालमीचा पैलवान अनुदान अनिल चव्हाण यांनी चमकदार कामगिरी करत रौप्यपदक पटकाविले आहे. त्यांनी फ्रिस्टाईल प्रकारात ६५ कि. वजनी गटात आपली कामगिरी करत एमआयटी डब्ल्यूपीयूचे नाव उज्वल केले. नुकतीच ही स्पर्धा धुळे येथे भरविण्यात आली होती.
पै. अनुदान याच्या यशाबद्दल एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
पै.अनुदान यांना वस्ताद पै. निखिल वणवे, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच विलास कथुरे, एमआयटी डब्ल्यूपीयूचे चे क्रीडा संचालक प्रा. पी.जी.धनवे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.