NEET UG Counselling 2023 : एमबीबीएस समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर, २० जुलैपासून नोंदणी

समुपदेशन समितीकडून देशपातळीवरील १५ टक्के कोटाअंतर्गत प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जाते. तर उर्वरित ८५ टक्के जागांवर प्रवेशासाठी संबंधित राज्यांतील यंत्रणेकडून प्रवेश दिले जातात.

NEET UG Counselling 2023 : एमबीबीएस समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर, २० जुलैपासून नोंदणी
NEET UG Counselling 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

NEET UG Counselling 2023 : देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस (MBBS), बीडीएस (BDS), आणि बीएसस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) ने आज NEET UG समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. समुपदेशनाच्या पहिल्या फेरीसाठीची नोंदणी प्रक्रिया २० जुलैपासून सुरू होणार आहे. (UG Medical Counselling)

समुपदेशन समितीकडून देशपातळीवरील १५ टक्के कोटाअंतर्गत प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जाते. तर उर्वरित ८५ टक्के जागांवर प्रवेशासाठी संबंधित राज्यांतील यंत्रणेकडून प्रवेश दिले जातात. देशपातळीवर कोट्यासाठीची प्रक्रिया २० जुलैपासून सुरू होणार आहे. पहिल्या फेरीसाठी २० ते २५ जुलै या कालावधीत नोंदण करता येणार आहे.

NExT 2023 : आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय, परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित

समुपदेशनाच्या पहिल्या फेरीच्या जागा वाटपाचा निकाल २९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना ३१ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान पहिल्या फेरीत मिळालेल्या संस्थांमध्ये आवश्यक कागदपत्रे जमा करावे लागतील. दुसरी फेरी ९ ते २८ ऑगस्ट २०२३ दरम्यान होणार आहे. तर तिसरी फेरी ३१ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर या कालावधीत होईल.

दरम्यान, नीट परीक्षा ही परीक्षा आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू अशा १३ भाषांमध्ये घेण्यात आली होती. एकूण २० लाख ३६ हजार, ३१६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी ११ लाख ४५ हजार ९७६ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

अशी करा नोंदणी -

* MCC च्या अधिकृत साइट mcc.nic.in ला भेट द्या.

*  NEET UG 2023 समुपदेशन लिंकवर क्लिक करा.

* उमेदवारांना नोंदणी लिंक मिळेल.

* त्या लिंकवर आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.

*  लॉग इन करा आणि अर्ज भरा, अर्ज शुल्क  भरा.

 * सबमिट वर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD