पुस्तकांच्या अनुवादाबाबत घ्या काळजी! UGC कडून मार्गदर्शक तत्वे जारी 

भाषांतरासाठी UGC ने ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) द्वारे विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) भाषांतर तंत्रज्ञान 'ANUVADINI' वापरण्याची शिफारस केली आहे.

पुस्तकांच्या अनुवादाबाबत घ्या काळजी! UGC कडून मार्गदर्शक तत्वे जारी 
UGC Guidelines

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर अनुवादित पाठ्यपुस्तकांची (Translation of Books) गुणवत्ता कायम राहावी, भाषांतर त्याच्या मूळ अर्थासह सोपे असावे, विद्यार्थ्यांना सोईचे व्हावे, या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. UGC ने उच्च शैक्षणिक संस्थांसाठी भारतीय भाषांमध्ये (Indian Language) पुस्तकांच्या अनुवादासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. 

भाषांतरासाठी UGC ने ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) द्वारे विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) भाषांतर तंत्रज्ञान 'ANUVADINI' वापरण्याची शिफारस केली आहे. UGC ने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, "कमिशन फॉर सायंटिफिक अँड टेक्निकल टर्मिनोलॉजी (CSTT) ने विविध विषयांमध्ये शब्दकोष विकसित केले आहेत. भाषांतराच्या कामात  नवीन शब्द किंवा संज्ञा अनुवादित करताना CSTT चा सल्ला घ्यावा.

Pune News : कृषी महाविद्यालय बनणार ‘एनर्जी हब’; देशातील पहिलाच प्रयोग

याव्यतिरिक्त, प्रादेशिक भाषेतील अनुवादासाठी ग्रंथ अकादमी, विद्यापीठे आणि संस्थांचे भाषा विभाग देखील संदर्भित केले जाऊ शकतात. आयोगाने अशी शिफारस देखील केली आहे की, जटिल तांत्रिक संज्ञा त्यांच्या भारतीय भाषेच्या समतुल्यतेनंतर त्याचा अर्थ  कंसात इंग्रजीमध्ये सादर केल्या जाऊ शकतात.

विद्यापीठे योग्य आणि सहज भाषांतरासाठी मशीन ट्रांसलेशन डिवाइसेस बसवू शकतात, असेही UGC ने म्हटले आहे. 'वर्ड तो वर्ड'  भाषांतर अनिवार्य नसले तरी, अनुवादित मजकुरांनी मूळ मजकुरातील संपूर्ण अर्थ आणि संकल्पना प्रभावीपणे व्यक्त केल्या पाहिजेत. सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिमाणे समाविष्ट करणारे भाषांतर असावे, असे  UGC ने त्यांच्या पत्रकात म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD