वारे गुरुजी ढसाढसा रडले ; प्रकाश महाजनांनी धुतले गुरुजींचे पाय

नाहक बदनामीची आठवण सर्वांना कायम होत राहावी म्हणून वारे गुरुजी शासकीय सेवेत असेपर्यंत अनवणीच राहतील ,असा ठराव मंगळवारी वाबळेवाडीकरांनी केला.

वारे गुरुजी ढसाढसा रडले ; प्रकाश महाजनांनी धुतले गुरुजींचे पाय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

वाबळेवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा (International standard school at Wablewadi) उभी करणाऱ्या दत्तात्रय वारे गुरुजी (Dattatray Ware Guruji) यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले, त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर निषेध म्हणून गुरुजींनी पायात चप्पल न घालण्याचे ठरवले. प्रशासनाने त्यांच्यावर केलेला एकही आरोप सिद्ध होत नसल्याचे (The charge against Ware Guruji was not proved) नुकतेच जिल्हा परिषदेने जाहीर केले.मात्र, विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान आणि वाबळेवाडीकरांच्या झालेल्या नाहक बदनामीची आठवण सर्वांना कायम होत राहावी म्हणून वारे गुरुजी शासकीय सेवेत असेपर्यंत अनवणीच राहतील, असा ठराव मंगळवारी वाबळेवाडीकरांनी केला.त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी त्यांचे पाय धुतले आणि वारे गुरुजी ढसाढसा रडले. (Vare Guruji cried.)

हेही वाचा: पदवीधर प्राथमिक शिक्षकांना लॉटरी; पदोन्नतीनंतर वेतन निश्चितीबाबत मोठा निर्णय

वाबळेवाडी शाळा चौकशी प्रकरणी प्रशासनातील काही अधिकारी व पदाधिकारी यांनी जाणीवपूर्वक शाळा उध्वस्त करण्याच्या उद्देशाने षडयंत्र रचल्याचे वाबळेवाडीकर सांगत आहेत. तसेच आम्ही सर्वांनी इतके प्रामाणिकपणे काम करून आमच्या नशिबी अपमान, बदनामी आली. वेगवेगळे अपमानास्पद आरोप करून वारे गुरुजी सारख्या व्यक्तीला नाहक खेळ करून त्रास दिला गेला.या सगळ्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या चुकीच्या घटनांचा निषेध म्हणून वारे गुरुजी यांनी पायात चप्पल घालणं सोडून दिले.

या पार्श्वभूमीवर वाबळेवाडीच्या ग्रामस्थांनी ठराव केला आहे. त्यानुसार जरी आता प्रशासनाने गुरूजींना दोष मुक्त जाहीर केले असले तरी अनेक शाळांच्या व शिक्षकांच्या बाबतीत असेच घडत असल्याचे या दोन वर्षात लक्षात आले आहे. यातून विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक बॅक फुटवर जात आहेत. एकंदरच सरकारी शाळेतील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात याचे फार वाईट परिणाम घडत आहेत.या सर्वांचा आवाज व चेहरा बनवून राहण्यासाठी आणि  प्रशासन कशा प्रकारच्या चुका करते हे सर्वांसमोर ठळकपणे येण्यासाठी, प्रशासनाने केलेल्या घोडचुकांची आठवण सतत राहण्यासाठी, आमचे सर्वांचे प्रतिनिधी म्हणून दत्तात्रेय वारे गुरुजी यांनी सरकारी सेवेत असेपर्यंत झालेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी अनवाणीच राहावे, अशी विनंती केली आहे.

दरम्यान, दत्तात्रेय वारे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथे भेट घेण्यासाठी बोलावले आहे.त्यास वारे गुरूजी यांनी दुजोरा दिला आहे.तसेच मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी मंगळवारी वारे गुरूजी यांची भेट घेतली.माझे वडील शिक्षक होते.त्यांनाही अशाच प्रकारे त्रास दिला होता,असे सांगत महाजन यांनी वारे गुरूजी यांचे पाय धुतले.तसेच माझ्या वडिलांच्या आत्म्याला खूप शांती लाभली असेल की त्यांच्या मुलाने एका आदर्श शिक्षकांचे पाया धुतले,असेही प्रकाश महाजन यांनी सांगितले.