दृष्टिकोन आणि समज येण्यासाठी एनएसएस शिबीरांची गरज : बागेश्री मंठाळकर ; अण्णासाहेब मगर महाविद्यायाचे रायरेश्वर येथे शिबिर

विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती व्हावी व त्यांनी या गडांचे संवर्धन करावे, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या वतीने  रायरेश्वर व केंजळगड या ठिकाणी जिल्हास्तरीय दुर्गसंवर्धन व स्वच्छता शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दृष्टिकोन आणि समज येण्यासाठी एनएसएस शिबीरांची गरज : बागेश्री मंठाळकर ; अण्णासाहेब मगर महाविद्यायाचे रायरेश्वर येथे शिबिर

दृष्टिकोन आणि समज या दोन गोष्टी वेगळ्या असून त्याचा वापर कसा करावा हे एनएसएसमध्ये (nss )चांगल्या प्रकारे शिकता येते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच शिबिरात आल्यानंतर संपूर्णपणे त्यात रंगून जा आणि त्याचा आनंद घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती व्हावी व त्यांनी या गडांचे संवर्धन करावे, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (pune university ) राष्ट्रीय सेवा योजना  (nss ) व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर annasaheb magar college महाविद्यालयाच्या वतीने रायरेश्वर व केंजळगड या ठिकाणी जिल्हास्तरीय दुर्गसंवर्धन व स्वच्छता शिबिराचे आयोजन करण्यात आले.त्यात विविध 20 महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (pune university ) व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन रायरेश्वराच्या पायथ्याशी कोर्ले या गावात करण्यात आले. यावेळी मंठाळकर बोलत होत्या.उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे, शंकरराव भेलके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे, अमृतेश्वर कला महाविद्यालय विंझर येथील प्राचार्य डॉ.  संजीव लाटे रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी, डॉ नीता कांबळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.  कार्यक्रमात डॉ. संजीव लाटे,डॉ तुषार शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. नीता कांबळे यांनी आभार तर सूत्रसंचालन डॉ. सविता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केली या शिबिराचे नियोजन डॉ. सविता कुलकर्णी , प्रा.अविनाश राठोड, जी. डी आवटे, डॉ.  वंदना सोनवले,  संजय जेधे यांनी केले.

दरम्यान शिबिराच्या दुसऱ्या दिवशी घनश्याम केळकर यांनी रायरेश्वर परिसराची माहिती दिली. या परिसरात राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर यासारखे किल्ले असून महाबळेश्वर पठार आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची सुरुवात येथील शंकराच्या देवळात शपथ घेऊन केली. त्यामुळे याला वेगळे महत्त्व आहे. या ठिकाणी पाण्याची कुंड असून येथे राहणाऱ्या लोकांना यातून पाणी पुरवली जाते. यावेळी विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता केली. तेथे असणारे प्लास्टिक गोळा करून गोणीत भरले.