JRF, SRF आणि रिसर्च असोसिएट्स स्टायपेंडमध्ये वाढ ; शिक्षण मंत्रालयाने केले ट्विट 

ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) स्टायफंड  ३१ हजार रुपयांवरून ३७ हजार रुपये तर SRF स्टायफंड ३५ हजार रुपयांवरून  ४२ हजार रुपये करण्यात आले आहेत.

JRF, SRF आणि रिसर्च असोसिएट्स स्टायपेंडमध्ये वाढ ; शिक्षण मंत्रालयाने केले ट्विट 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ऑल-इंडिया रिसर्च स्कॉलर्स असोसिएशनच्या (एआयआरएसए) वतीने करण्यात येत असलेली मागणी शिक्षण मंत्रालयाने (Ministry of Education) मान्य करत पीएचडी विद्यार्थी आणि संशोधकांच्या स्टायफंडमध्ये वाढ केली आहे. शिक्षण मंत्रालयाने ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF), वरिष्ठ संशोधन फेलोशिप (SRF) आणि रिसर्च असोसिएट्ससाठी स्टायपेंड वाढवले आहेत.

हेही वाचा : विद्यार्थ्यांना नापास करणाऱ्या प्राध्यापकांना शिक्षा ; परीक्षेत दिले चुकीचे गुण

सुधारित फेलोशिप स्टायफंड चार्टनुसार, ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) स्टायफंड  ३१ हजार रुपयांवरून ३७ हजार रुपये तर SRF स्टायफंड ३५ हजार रुपयांवरून  ४२ हजार रुपये करण्यात आले आहेत.  रिसर्च असोसिएट १ ला ५८ हजार रुपये,  रिसर्च असोसिएट २ ला ६१ हजार रुपये आणि रिसर्च असोसिएट ३ ला ६७ हजार रुपये स्टायफंड देण्यात येणार आहे. एआयआरएसएकडून गेल्या एक वर्षापासून फेलोशिप वाढवण्याची मागणी केली जात होती.

शिक्षण मंत्रालयाने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर ही घोषणा केली आहे.  त्यात शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, ' उच्च शिक्षण संस्थांमधील संशोधकांचे मासिक वेतन वाढले आहे.   यामुळे R&D इकोसिस्टमला लक्षणीय चालना मिळेल आणि संशोधकांना सुविधा मिळेल. यामुळे  सरकारला  अंदाजे ७२५  कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील.'