coep मधील मुली असुरक्षित; नकळत आक्षेपार्ह फोटो काढले, विद्यार्थिनीचे केले निलंबन 

एका विद्यार्थीनीचे रूममेटचे आक्षेपार्ह फोटो काढून युनिव्हर्सिटी कॅम्पस बाहेरील व्यक्तीला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

coep मधील मुली असुरक्षित; नकळत आक्षेपार्ह फोटो काढले, विद्यार्थिनीचे केले निलंबन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 COEP Technological University : सीओईपी टेक युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने तिच्याच रूममेटचे आक्षेपार्ह फोटो (Offensive photos by roommate) काढून युनिव्हर्सिटी कॅम्पस बाहेरील व्यक्तीला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार (Complaint to the police in this case)देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या घटनेची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने समिती (Committee by the University to inquire)स्थापन केली असून एका विद्यार्थिनीला वसतीगृहातून काढून टाकले असून तिचे तात्पुरते निलंबन (Student suspended)करण्यात आले आहे. 
 
सीओईपी  विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थिनींनी त्यांच्या एका रूममेटच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती.त्यात संबंधित मुलगी रूममधील मुलींचे आक्षेपार्ह फोटो त्यांच्या नकळत क्लिक करून  विद्यापीठाच्या आवाराबाहेर इतर कोणाशी तरी शेअर करत होती.त्यातच मुलींनी पोलिसांकडे तक्रार करूनही विद्यापीठ प्रशासन काहीही करत नसल्याची पोस्ट एका विद्यार्थिनींने एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केली होती.त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने याबाबत दाखल घेऊन चौकशी समिती स्थापन केली आहे.

सीओईपी टेक युनिव्हर्सिटीचे कुलसचिव डी.एन. सोनवणे म्हणाले, "सीओईपी टेक युनिव्हर्सिटीने आरोप झालेल्या  विद्यार्थिनीला वसतिगृह कॅम्पसमधून काढून टाकले आहे.तसेच चौकशीच्यापूर्ण होईपर्यंत विद्यापीठातून तिचे तात्पुरते निलंबित केले आहे. सीओईपी प्रशासन विद्यार्थ्यांना सुरक्षित व चांगल्या वातावरणात शिक्षण देण्यासाठी काटिबद्ध आहे. कोणताही  छळ, शोषण किंवा भीतीशिवाय विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी पूरक वातावरण देण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे.