नवोदय विद्यालयात विविध पदांसाठी भरती ; 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येणार

अर्ज करण्याची अंतिम मुदत आता पुन्हा एकदा 14 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

नवोदय विद्यालयात विविध पदांसाठी भरती ; 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवोदय विद्यालय समितीने (NVS) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, महिला स्टाफ नर्स, इलेक्ट्रीशियन कम प्लंबर, मेस हेल्पर, MTS यासह शिक्षकेतर पदांच्या थेट भरतीसाठी नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.  या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत (Application deadline) एकदा 14 मेपर्यंत (Extension till May 14) वाढवण्यात आली आहे. 

यापुर्वी अर्ज करण्याची मुदत ७ मेपर्यंत देण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा येत्या 14 मेपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवार navodaya.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अधिक माहिती पाहू शकतात. 

कशी पहा अधिसुचना 

प्रथम navodaya.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. नंतर होमपेजवर सूचना/रिक्त जागा विभागात जा. NVS मधील HQ/RO आणि JNV कॅडरच्या विविध अशैक्षणिक पदांसाठी थेट भरती ड्राइव्ह २०२४ साठी अधिसूचना” असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. स्क्रीनवर एक PDF उघडेल, दिलेल्या तपशील वाचा आणि त्याचे पालन करा. PDF डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याचे प्रिंटआउट काढून ठेवा.

ही भरती नवोदय विद्यालय समिती अंतर्गत व राज्य सरकार अंतर्गत केली जाणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने  स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारांकडून  14 मेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. 8 ते 30 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. (मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वयात सूट देण्यात आली आहे) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1 हजार रुपये, मागासवर्गीय, दुर्बल व अनाथ या उमेदवारांसाठी 500 रुपये अर्ज शुल्क आकरण्यात आला आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात असणार आहे. (संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)