SPPU NEWS : मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप सांगळे

अभ्यास मंडळाच्या सदस्य पदासाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीद्वारे डॉ.सांगळे यांची विक्रमी मतांनी निवड झाली होती.डॉ.सांगळे हे यापूर्वी पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर तीन वेळा निवडून आले आहेत. 

SPPU NEWS :  मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप सांगळे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क   

                       
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या (Sppu Marathi Studies Board ) अध्यक्षपदी शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील (Talegaon dhamdhere college) मराठी विभाग प्रमुख डॉ.संदीप विठ्ठलराव सांगळे (Dr. Sandeep Sangale )यांची यांची निवड झाली आहे. पत्रकार, प्राध्यापक , प्रभारी प्राचार्य , अभ्यास मंडळ सदस्य आणि आता अध्यक्ष असा संदीप सांगळे यांचा आतापर्यंतचा प्रवास आहे.तसेच डॉ. सांगळे हे कर्जत येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेचे संस्थापक मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहेत.
   अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी हे डॉ. सांगळे  यांचे मूळ गाव असून सध्या ते तळेगाव ढमढेरे येथील महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहता आहेत. मागील 23 वर्षांपासून ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अभ्यास मंडळाच्या सदस्य पदासाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीद्वारे डॉ.सांगळे यांची विक्रमी मतांनी निवड झाली होती.डॉ.सांगळे हे यापूर्वी पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर तीन वेळा निवडून आले आहेत. 

    कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय व रयत शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल टाकळी खंडेश्वरी , श्रीगोंदा फॅक्टरी येथील इंदिरा गांधी विद्या निकेतन, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय , कोथरूड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालय इत्यादी शाळा आणि महाविद्यालयांचे डॉ. संदीप सांगळे हे माजी विद्यार्थी आहेत. 
   टाकळी खंडेश्वरी गावचे समस्त ग्रामस्थ, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक व शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेशबापू ढमढेरे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले आदींनी डॉ. सांगळे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे. विद्यापीठ अभ्यास मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. सांगळे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.