जागतिक पुस्तक महोत्सवात पुण्याच्या दालनांना वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; राजेश पांडे यांची माहिती

मान्यवर लेखकांच्या विविध पुस्तकांचे प्रकाशन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

जागतिक पुस्तक महोत्सवात पुण्याच्या दालनांना वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; राजेश पांडे यांची माहिती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ५१ व्या जागतिक पुस्तक महोत्सवातील (51st World Book Festival) पुणे पुस्तक महोत्सवाच्या (Pune Book Festival) दालनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती संयोजक राजेश पांडे (Rajesh Pande) यांनी दिली आहे. उद्या दुपारी ४ वाजता मान्यवर लेखकांच्या विविध पुस्तकांचे प्रकाशन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungatiwar) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

यंदा पहिल्यांदाच पुणे पुस्तक महोत्सवाचे स्वतंत्र दालन असल्याची माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी कळविली आहे.यावेळी भाजप नेते विनोद तावडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी दिल्लीतील महाराष्ट्रीयन नागरिकांचे एकीकरण केले जाणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. 

पांडे म्हणाले, राज्यातील १५० कलाकार उद्या सायंकाळी महाराष्ट्राची लोकधारा आणि शिववंदना सादर करणार आहेत. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त आपली समृद्ध लोककला, वारसा यांचा समावेश असणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. गणेशवंदना, दिवली नृत्य, गजी नृत्य, कोळी गीत, दहीहंडी, ढेमसा / रेला नृत्य, लावणी, मंगळागौर, महाराष्ट्रगीत मेडली, पंढरीची वारी, गोंधळ, शिवराज्याभिषेक असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. हा कार्यक्रम सुमारे ७० मिनिटांचा असणार आहे.