नोकरीच्या मागे न धावता धोका पत्करून स्टार्टअप सुरू करा : अमिताभ कांत

पुण्यातील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ शनिवारी पार पाडला. यावेळी विद्यापीठाच्या ५ हजार १८० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

नोकरीच्या मागे न धावता धोका पत्करून स्टार्टअप सुरू करा : अमिताभ कांत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता धोका पत्करून स्टार्टअप (StatrtUp) सुरू करावे. सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक आव्हानांचा सामना करावा. आजच्या काळात तंत्रज्ञान, संशोधन आणि शांती या तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत,” असा सल्ला नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिताभ कांत (Amitabh Kant) यांनी विद्यार्थ्यांना दिला.

 

पुण्यातील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा (MIT World Peace University) पाचवा दीक्षांत समारंभ शनिवारी पार पाडला. यावेळी विद्यापीठाच्या ५ हजार १८० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विज्ञान क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना डॉ. विश्वनाथ कराड, अमिताभ कांत व राहुल कराड यांच्या हस्ते ‘एमआयटी डब्ल्यूपीयू विज्ञान महर्षी सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, सरस्वतीची मुर्ती व ५ लक्ष रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणानंतर बनारस हिंदू विद्यापीठाचे होणार विभाजन

 

याप्रसंगी सोमय्या बाजपेयी हिला ‘फाउंडर प्रेसिडेंट मेडल’ व अन्वेशा भट्टाचार्य हिला ‘एक्जीकेटीव्ह प्रेजिडेंट मेडल’ ने गौरविण्यात आले. तसेच ९२ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, ३४ रौप्य आणि १४ कास्य पदक असे एकूण १४० विद्यार्थ्यांना मेडल बहाल करण्यात आले. तसेच १६ विद्यार्थ्यांना पी.एचडी देण्यात आली. यामध्ये ४२६ विद्यार्थी मेरीट लिस्ट मधील आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, व्यवस्थापन (यूजी व पीजी), लिबरल ऑर्टस, बीएड, फाइन ऑर्टस, मिडिया अ‍ॅण्ड पत्रकारिता, वाणिज्य, अर्थशास्त्र, विज्ञान,फॉर्मसी, सस्टेनेबल स्टडीज, डिझाइन, गर्व्हनन्स इ. शाखेत मिळून एकूण ५१८० विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली.

 

अभिताभ कांत म्हणाले, "सध्या देशाची ३.५ ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्था आहे. देश कॅशलेस आणि पेपरलेस होत असताना डिजिटल पेमेंटच्या संख्येत वृध्दि होत आहे. वैज्ञानिक युगात एआयचा उपयोग मिलेट्री, पोलिस, ऑटोनॉमिक, शेती बरोबरच अन्य क्षेत्रात होत आहे. भविष्यात आरोग्य, न्यूट्रीशियन्स, स्पेस, सोलर या मध्ये मोठ्या व्यवसायाच्या संधी आहेत. तसेच भविष्यात ऊर्जा, डाटा सायन्स, पर्यावरण आणि शाश्वत विषय महत्वाचे असतील.”

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, "दीक्षांत या शब्दाचा अर्थ शिक्षांत नाही तर आयुष्य भर विद्यार्थी राहून सतत शिकत रहावे. विज्ञानाशिवाय प्रगती होऊ शकत नाही त्यामुळे सतत संशोधन करत रहावे. विद्यार्थ्यांनी लक्ष्य मोठे ठेवणे, शांततेच्या मार्गाने कठीण परिश्रम करत रहाणे, आपल्या कामाचा उद्देश किंवा हेतू चांगले ठेवणे आणि आपले ध्येय साध्य करण्याची मर्यादा ठेवू नये. या गोष्टी लक्षात ठेवाव्या.”

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO