आबेदा इनामदार कॉलेजमध्ये मतदार जागृती कार्यक्रम

प्रत्येक निवडणुकीत प्रत्येकानी मोठ्या संख्येने निवडणुकीत सहभागी होऊन मतदार करावे.

आबेदा इनामदार कॉलेजमध्ये मतदार जागृती कार्यक्रम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आबेदा इनामदार सिनिअर कॉलेज मध्ये मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.त्याचाच एक भाग म्हणून निवडणूकीत मतदान करताना काय विचार करून मतदार मतदान करतात ? निवडणूकीत मतदान करताना कोणत्या मुद्यांच्या आधारे मतदार मतदान करतात? हे जाणून घेण्यासाठी एक मतपेटी तयार करण्यात आली होती.प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक आणि विद्यार्थीनींनी आपापली मते व मुद्दे चिठ्ठ्यावर  लिहुन मत पेटीत टाकले. मतपेटी उघडून चिठ्ठ्यात लिहिलेल्या प्रतिक्रियांचे सामुहिक वाचन करण्यात आले. 

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कॉलेजचे प्राचार्य डॉ. शैला बुटवाला, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. वहिदा शेख, प्राध्यापक आणि विद्यार्थीनीं येऊ घातलेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली. राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. वहिद शेख आणि प्राध्यापक शबाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बुशरा शेख आणि इतर विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व सांगणारे एक फलक तयार केले.

प्राध्यापक अली माळेगावकर, बुशरा शेख, इसरा पानसरे, श्रावणी नागरे, अफरोज शेख, अफशा शहा, गजला शेख, रमीजा सय्यद, हाजराबी पठाण, राहुल आदीवाल, अनस शेख, अहद शेख, इरफान खान आणि अब्दुल वदुद या विद्यार्थ्यांनी नौरोसजी वाडीया महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक जयंत साळवे यांनी लिहिल्या "ओळखपत्र घेऊ द्या की हो, मला बी ओटिंगला येऊ द्या की" या मतदार जागृती गीतांचे सामुहिक सादरीकरण करण्यात आले. श्रावणी नागरे या विद्यार्थ्यांनीने मतदार जागृती करणारे गीतांचे सादरीकरण केले. 

मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वहिदा शेख यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य आणि महत्त्व सांगितले. प्राचार्य, डॉ. शैला बुटवाला यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीत मतदानाचे महत्त्व सांगितले. तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत प्रत्येकानी मोठ्या संख्येने निवडणुकीत सहभागी होऊन मतदार करावे, असे आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक शबाना शेख यांनी केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. आफताब आलम, डॉ. अजमत दलाल, डॉ. महेजबिश शेख, डॉ. मुकुल जोशी, डॉ. मुनीरा लोखंडवाला, डॉ. शाहीन पटेल, डॉ. शकीला मुल्ला, डॉ. केतकी भोसले, डॉ. सलमा अजित, प्राध्यापक रहेमउल्ला खान, डॉ. खालील अर्शद, डॉ. शिल्पा अमनगाई यांचे सहकार्य लाभले.