सी-डॅकची गरूडझेप, तयार केली तेलाचे साठे शोधणारी भारतातील पहिली स्वदेशी प्रणाली

‘रिव्हर्स टाइम मायग्रेशन’असे सी-डॅकने तयार केलेल्या प्रणालीचे नाव आहे. या विकसित प्रणालीद्वारे समुद्रातील आणि जमिनीच्या भूभर्गातील ध्वनीलहरींचा अभ्यास करून तेल आणि वायूचे साठे शोधता येणार आहेत.

सी-डॅकची गरूडझेप, तयार केली तेलाचे साठे शोधणारी भारतातील पहिली स्वदेशी प्रणाली

 समुद्र आणि जमिनीच्या भूभर्गात असलेल्या पाषाणांचा शोध घेऊन ध्वनीलहरींच्यामार्फत त्यात कच्च्या तेलाचे आणि वायूचे साठे कोठे आहेत, हे शोधून काढणारी प्रणाली आतापर्यंत भारतात विकसित नव्हती. परंतु, प्रथमच भारतात कच्या तेलाचे आणि वायूचे साठे  शोधून काढणारी प्रणाली oil and gas reservoir exploration system सी-डॅकने C-Dac विकसित केली आहे,असे सी-डॅकचे संचालक ई. मगेश यांनी सांगितले. 

‘रिव्हर्स टाइम मायग्रेशन’असे सी-डॅकने तयार केलेल्या प्रणालीचे नाव आहे. या विकसित प्रणालीद्वारे समुद्रातील आणि जमिनीच्या भूभर्गातील ध्वनीलहरींचा अभ्यास करून तेल आणि वायूचे साठे शोधता येणार आहेत. त्यामुळे आता भारतातील तेल व वायू कंपन्यांना यासाठी परदेशी प्रणालीवर अवलंबून राहावे लागणार नाही.

पुढच्या वर्षीपासून ही सी-डॅकची प्रणाली कार्यन्वित होणार आहे. तसेच सध्या विविध कंपन्यांकडून या प्रणालीच्या चाचण्या सुरू आहेत, असे नमूद करून  ई. मगेश म्हणाले, सी-डॅकने भारतातच ही सेवा उपलब्ध करून दिल्याने आता वर्षाला कोट्यावधी रूपये जे परकीय देशात जात होते, ते आता भारताच्याच तिजोरीत राहणार आहेत.

अशी कार्य करणार रिव्हर्स टाइम मायग्रेशन प्रणाली-  

तेलाचे आणि वायूचे साठ्यांचा शोध घेण्यासाठी या कंपन्यांकडून जमिनीच्या आत कृत्रिमरीत्या स्फोट घडवून आणले जातात. या स्फोटांतून जो ध्वनी लहरींचा डेटा तयार होतो, तो आता रिव्हर्स टाइम मायग्रेशन प्रणालीमध्ये समाविष्ट होणार आहे. यानंतर ध्वनीलहरींद्वारे पूर्वीचा जुना डेटा आणि नवा डेटा एकत्रित केला जाणार आहे. याचा अभ्यास करून जमिनीत कोणत्या ठिकाणी तेलाचे, वायूचे साठे आहेत, याचा अंदाज लावता येणार आहे.