IITM पुणे करणार काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील कार्बन डाय ऑक्साइडचे  मूल्यांकन

झाडांकडून कार्बन डाय ऑक्साईडचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते. तसेच कार्बन डाय ऑक्साईड हवेत सोडलाही जातो. झाडांकडून ऑक्सीजन सोडण्याचे प्रमाणतही अधिक असतो.

IITM पुणे करणार काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील कार्बन डाय ऑक्साइडचे  मूल्यांकन
Kaziranga National park-IITM Pune

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) या संस्थेने एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील (Kaziranga National Park) कार्बन डायऑक्साइडचे (carbon Dioxide) मूल्यांकन करण्याच्या प्रकल्पासाठी तेजपूर विद्यापीठ (Tezpur University) आणि IITM ने सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत  ग्लोबल वार्मिंगमुळे (Global Warming) कार्बन शोषण्याची जंगलांची क्षमता आणखी कमी होऊ शकते का, यावर प्रामुख्याने संशोधन करण्यात येणार आहे.(Tezpur University, IITM Pune join hands to study carbon exchange in Kaziranga National Park)

झाडांकडून कार्बन डाय ऑक्साईडचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते. तसेच कार्बन डाय ऑक्साईड हवेत सोडलाही जातो. झाडांकडून ऑक्सीजन सोडण्याचे प्रमाणतही अधिक असते. मात्र, ग्लोबल वॉर्मिंगमुळे या इकोसिस्टीमवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचीच पडताळणी करण्यासाठी काझीरंगा उद्यानाची निवड करण्यात आली आहे.

NASA News : पुण्यातील ११ वर्षीय रोहनची 'नासा'मध्ये संशोधनासाठी निवड

उद्यानातील कार्बन डाय ऑक्साईड व ऑक्सीजनच्या पातळीचे मोजमाप आयआयटीएम कडून विविध पातळ्यांवर केले जाणार आहे. तसेच   बायोस्फियर-वातावरणात हरितगृह वायू आणि उर्जेची देवाणघेवाण, पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा, किरणोत्सर्ग, मातीचे तापमान यासारख्या हवामानशास्त्रीय आणि जैव-हवामानशास्त्रीय मापदंडांचे निरीक्षण आदी  संशोधन कार्यात IITM आणि तेजपूर विद्यापीठ संयुक्तरित्या काम करणार आहेत. 

या सामंजस्य करारावर पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू आणि भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांच्या उपस्थितीत आयआयटीएमचे संचालक डॉ आर कृष्णन आणि तेजपूर विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. बिरेन दास यांनी स्वाक्षरी केली. या सामंजस्य कराराबद्दल बोलताना  तेजपूर विद्यापीठाचे कुलगुरू शंभू नाथ सिंह म्हणाले, आम्हाला या महत्त्वपूर्ण संशोधन प्रयत्नात आयआयटीएम पुणेसोबत हातमिळवणी करताना आनंद होत आहे. या सहकार्याद्वारे, आम्ही शाश्वत संवर्धन धोरणांच्या विकासात योगदान देण्याची आशा करतो.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD