'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' एक उपयुक्त पर्याय 

उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात होणारी लिपिक, लेखनिक आदी कामांमध्ये सुद्धा आता मानवी कामगारांची जागा AI घेत आहे. त्यामुळे येत्या काळात अशा कामांची संख्या कमी होऊन ज्या व्यक्तींना ' डोमेन नॉलेज' आहे, जे 'टेक्नो सॅव्ही' आहेत अशा लोकांसाठी कामाच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' एक उपयुक्त पर्याय 

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एक शब्द आता वारंवार कानावर पडून सर्वसामान्यांच्या परिचयाचा होत आहे, तो शब्द म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता ) अर्थात AI. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची दररोजच्या वापरातील उदाहरणे म्हणजे स्मार्ट फोन, I Phone, Windows 10 मध्ये Cortana आणि Siri ,  GPS सिस्टिम, व्हॉइस टाइपिंग, जीमेल मध्ये टाइपिंग करत असताना येणार शब्दांचे पर्याय आदी गोष्टी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची कमाल आहे.

आर्थर सॅम्युअल नावाच्या अमेरिकन कम्प्युटर वैज्ञानिकाने सर्वात प्रथम १९५९ मध्ये मशीन लर्निंग म्हणजेच  आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बद्दल सांगितलं होतं. संगणकाला कोणत्याही खास प्रोग्राम शिवाय मशीन लर्निंगद्वारे  अशा प्रकारे बनवले जाऊ शकते की तो स्वतःहून निर्णय घेऊ शकतो, अशी माहिती आर्थर सॅम्युअल यांनी दिली होती. भारतात वैद्यकीय, स्वास्थ्य, शिक्षा, संचार, वाहतूक, शेती, आपत्ती व्यवस्थापन, इंजीनियरिंगमध्ये असे  कोणताही क्षेत्र नाही ज्यात AI चा वापर केला जात नाही. देशात AI ची वाढती आवश्यकता तसेच रोजच्या जीवनशैलीतील गोष्टींपासून रोजगार, व्यवसाय, विज्ञान, टेक्नॉलॉजी, अभियांत्रिकी या सर्व क्षेत्रांमध्ये टेक्नॉलॉजीचा वाढत वापर येणाऱ्या काळात महत्वपूर्ण भूमिका बजावेल. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने मशीन, कॉम्प्युटर आणि यंत्र बनवून भविष्यात महत्वाची कामे करण्यासाठी मानवा ऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली जाऊ शकते. कोणतेही कठीण काम एका बुद्धिमान मशीनमार्फत केले जाऊ शकते. तसेच मशीनचा वापर 24 तास केला जाऊ शकतो. त्यामुळे भविष्यात या तंत्रज्ञाचा खूप फायदा होऊ शकतो. अनेक ऑनलाईन कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत ग्राहकांना अनेक चांगल्या सेवा देऊ शकतात. त्यासोबत डेटा चोरी होणे, ऑनलाईन लिक्स, ऑनलाईन फ्रॉड्स इत्यादी गोष्टींवर नियत्रंणआणता येऊ शकते. डिजिटल गोष्टीमध्ये एआयचा खूप फायदा होऊ शकतो. जसे की स्मार्टफोन्स, ऑनलाईन बँकिंग व्यवहार, ऑनलाईन डेटा, फाईल्स सुरक्षित राहू शकतात. कोणीही यांना हॅक किंवा अॅक्सेस करु शकणार नाही. त्यामुळे गोपनीयता धोरण पाळले जाईल. त्यामुळे एआय च्या क्षेत्रात नोकऱ्यांची संधी खूप वाढू शकते.

यासर्व गोष्टींचा विचार करून नवीन पिढीला AI या तंत्रज्ञानात प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक सक्षम बनवणे आवश्यक आहे. त्यासाठी उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमात बदल, विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. या विषयावर ' एज्युवार्ता' शी संवाद साधताना ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ दीपक शिकारपूर म्हणाले, " उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात होणारी लिपिक, लेखनिक आदी कामांमध्ये सुद्धा आता मानवी कामगारांची जागा AI घेत आहे. त्यामुळे येत्या काळात अशा कामांची संख्या कमी होऊन ज्या व्यक्तींना ' डोमेन नॉलेज' आहे, जे 'टेक्नो सॅव्ही' आहेत अशा लोकांसाठी कामाच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध होणार आहेत." नवीन पिढीला तंत्रज्ञाच्या दृष्टीने अधिक कुशल बनवण्यासाठी काही आवश्यक बदल गरजेचे आहेत. महत्वाचे म्हणजे उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मोठा बदल अपेक्षित आहे. पण आपल्याकडची शिक्षण पद्धती अभ्यासक्रम बदलाच्या बाबतीत खूप संथ आहे," अशी नाराजी शिकारपूर यांनी व्यक्त केली.