Chandrayaan 3 : प्रज्ञान रोव्हर चंद्रावर फिरू लागले, आता पुढचे १४ दिवस काय शोधणार? वाचा संपूर्ण माहिती...

चंद्रयान ३ मोहिमेअंतर्गत बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग करत इस्त्रोने इतिहास घडवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे.

Chandrayaan 3 : प्रज्ञान रोव्हर चंद्रावर फिरू लागले, आता पुढचे १४ दिवस काय शोधणार? वाचा संपूर्ण माहिती...
Chandrayaan 3 ISRO

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

चंद्रयान ३ (Chandrayaan 3 Landing) चे चंद्रावर यशस्वी लॅंडिंग झाल्यानंतर आता पुढे काय, चंद्रयान ३ चंद्रावर (Moon) कोणकोणत्या गोष्टींचे संशोधन करणार आहे, असे अनेक प्रश्न  आता सर्वसामान्यांना पडले आहे. चंद्रावर पाणी आहे का? चंद्रावर भविष्यात मानवी वस्ती वसवली जाऊ शकते का? याचा शोध चंद्रयान ३ च्या माध्यमातून घेतला जाणार आहे. त्यासाठी विविध उपकरणांचा वापर केला जाणार असून ही मोहिम प्रत्यक्ष चंद्रावर चौदा दिवसांची असेल. 

चंद्रयान ३ मोहिमेअंतर्गत बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी विक्रम लँडरचे (Vikram Lander) चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग करत इस्त्रोने इतिहास घडवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. विक्रमचे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर सुमारे अडीच तासांत सहा चाके असलेला प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) लँडरमधून बाहेर पडला. त्याची छायाचित्रेही इस्त्रोकडून (ISRO) प्रसारित करण्यात आली आहेत.

NCFSC 2023 : आता वर्षातून दोन वेळा होणार बोर्डाच्या परीक्षा

आता पुढे काय?

विक्रम आणि प्रज्ञान हे दोन्ही सौरऊर्जेवर पुढील १४ दिवस चालणार आहेत. पृथ्वीवरील चौदा दिवस म्हणजे चंद्रावरील एक दिवस असतो. त्यानंतर चंद्रावर अंधार होतो. त्यामुळे त्यानंतरचे पुढील चौदा दिवस सुर्यप्रकार मिळणार नाही. परिणामी, विक्रम व प्रज्ञान काम करू शकणार नाहीत. याचा अर्थ प्रज्ञान रोव्हर कडे चौदा दिवस असून दक्षिण ध्रुवावर ते या काळात दक्षिण ध्रुवावर फिरणार आहे. अंधार पडल्यानंतर पुढील चौदा दिवसांनंतरही ही दोन्ही उपकरणे कार्यरत राहू शकतील, अशा आशावाद शास्त्रज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

प्रज्ञान काय शोधणार?

चंद्रयान-३ च्या लँडर मॉड्यूलमध्ये 'विक्रम' लँडर आणि 'प्रज्ञान' रोव्हरचा समावेश आहे. ते दोघेही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरल्यानंतर, त्यांचे  आयुष्य केवळ एका दिवसाचे  असेल. म्हणजे चंद्रावरील एक दिवसात ते   संशोधन करतील. चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो. इस्रोने लँडर मॉड्यूलमध्ये महत्त्वाचे पेलोड लावले आहेत. यापैकी एक म्हणजे 'रेडिओ ऍनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फियर अँड एटमॉस्फियर.' (RAMBHA) हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा घनतेची तपासणी करेल. तिथल्या आयन आणि इलेक्ट्रॉन्सची पातळी आणि काळानुसार त्यात होणारे बदल यांचा अभ्यास करून माहिती गोळा करेल. हे महत्त्वाचे  उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील गुणधर्मांचा अभ्यास करेल. 

Chandrayaan 3 Landing : इतिहास घडला! चंद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग, इस्त्रोने करून दाखवलं!

'इंस्ट्रुमेंट फॉर लूनार सिस्मिक एक्टिविटी' (आयएलएसए)  हे एक प्रमुख उपकरण आहे. हे उपकरण चंद्रयान-३ च्या लँडिंग स्थळावर होणाऱ्या भूकंपाच्या हालचालींची तपासणी करेल. चंद्रावर भविष्यात मानवी वस्ती करण्यासाठी हा महत्वाचा शोध असेल. भविष्यात चंद्रावर मानवी वसाहती करायच्या असतील, तर आधी तिथल्या भूकंपीय क्रियाकलापांचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे, हे उपकरण चंद्रयान-३ च्या लँडिंग साइटवरील भूकंपाच्या हालचालींचा अभ्यास करेल आणि चंद्राच्या कवच आणि आवरणाची तपासणी करेल. यासोबतच एलआरए नावाचा आणखी एक पेलोड लँडरमध्ये बसवण्यात आला आहे. एलआरएला हे उपकरण चंद्राच्या गतिशीलतेची तपासणी करते. चंद्रावर लँडरच्या सॉफ्ट लँडिंगनंतर, रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि संशोधन करण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल. 

एलआयबीएस म्हणजेच लेझर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप. हे मुख्य उपकरण आहे. एखाद्या ठिकाणचे घटक आणि त्यांचे गुणधर्म ओळखण्यासाठी वापरली जाणारी ही एक अत्याधुनिक पद्धत आहे. हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावर अतिशय तीव्र लेसर प्रकाश टाकेल. त्यामुळे पृष्ठभागावरील माती वितळून प्रकाश उत्सर्जित होईल. त्याच्या तरंगलांबीचे विश्लेषण करून, एलआयबीएस पृष्ठभागावर असणाऱ्या रासायनिक घटकांची ओळख पटवेल. रोव्हरवर बसवलेले हे एलआयबीएस उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह या घटकांचा शोध घेण्यात मदत करेल. चंद्रावरील या मोहिमांमध्ये हे सर्वात महत्त्वाचे संशोधन आहे. एलआयबीएस चंद्राच्या पृष्ठभागावर १४ दिवस घालवेल आणि विविध ठिकाणी विश्लेषित केलेली माहिती लँडरला पाठवेल. लँडर ही माहिती इंडियन डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल. या माहितीचे विश्लेषण करून इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या घटकांची माहिती मिळवेल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo