CBSE, ICSE आणि IB बोर्डाच्या शाळांनाही उद्यापासून सुट्टी 

महाराष्ट्र सरकारने  राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना  २१ एप्रिलपासून सुट्या जाहीर केल्या आहेत.

CBSE, ICSE आणि IB बोर्डाच्या शाळांनाही उद्यापासून सुट्टी 
Summer Vacation

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात आणि देशभरात उन्हाचा वाढता कडाका लक्षात घेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC Board) शाळांना यंदाची उन्हाळी सुट्टी (Summer Vacation) लवकर जाहीर केली. राज्यातील इतर बोर्डांच्या शाळा मात्र सुरूच होत्या. पण आता सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे या मंडळांनीही शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे.

हेही वाचा : मुलांनो, उन्हाळी सुट्टी अशी लावा सार्थकी..डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितल्या या महत्वाच्या टिप्स!

CBSE, ICSE आणि IB या मंडळांनी त्यांच्या शाळांना लवकर उन्हाळी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या मंडळाच्या शाळांच्या उन्हाळी सुट्या उद्या म्हणजेच २९ एप्रिल पासून सुरु होणार आहेत. या मंडळांनी महाराष्ट्र व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, पSSCश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा  या राज्यांमध्येही सुट्या जाहीर केल्या आहेत. 

महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना २१ एप्रिलपासून सुट्या जाहीर केल्या आहेत.  वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर शाळा १५ जूनपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.