टेलिकॉममध्ये संशोधनासाठी सिम्बायोसिस व इन्फॉर्मेशन डेटा सिस्टीमध्ये करार

हेडेरा हॅशग्राफ आणि भारत ब्लॉकचेन नेटवर्क (BBN) वर लक्ष केंद्रित करून SIDTM येथे अप्लाइड ब्लॉकचेन केंद्र स्थापन करणे हे या सामंजस्य कराराचे  (MOU) प्रमुख उद्दिष्ट आहे.

टेलिकॉममध्ये संशोधनासाठी सिम्बायोसिस व इन्फॉर्मेशन डेटा सिस्टीमध्ये करार
Symbiosis University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ब्लॉकचेन शिक्षण आणि टेलिकॉम क्षेत्रातील उपयोजित संशोधनाला (Research) चालना देण्यासाठी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिजिटल अँड टेलिकॉम मॅनेजमेंट (SIDTM)  व इन्फॉर्मेशन डेटा सिस्टम (IDS) यांच्यात सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे.  हेडेरा हॅशग्राफ आणि भारत ब्लॉकचेन नेटवर्क (BBN) वर लक्ष केंद्रित करून SIDTM येथे अप्लाइड ब्लॉकचेन केंद्र स्थापन करणे हे या सामंजस्य कराराचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

डिजिटल आणि दूरसंचार क्षेत्रासाठी एंटरप्राइझ ब्लॉकचेन, हेडेरा हॅशग्राफ वापर,  प्रकरणे आणि अंमलबजावणी, भारत ब्लॉकचेन नेटवर्कवर राष्ट्रीय हिताची मुद्यांना संबोधित करणे, या तीन गोष्टींवर या कराराअंतर्गत प्राधान्य असेल. सिम्बायोसिसचे निवडक विद्यार्थी आणि शिक्षकांना MBA प्रोग्राम अंतर्गत उपयोजित संशोधनासाठी अप्लाइड ब्लॉकचेन सेंटरच्या अत्याधुनिक लॅब सुविधांमध्ये प्रवेश  येईल. 

राज्यात आणखी दोन खासगी विद्यापीठे; डीईएस, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठांचा मार्ग मोकळा

ब्लॉकचेन कौशल्याला चालना देण्यासाठी दूरसंचार व्यावसायिकांसाठी संयुक्त ब्लॉकचेन प्रमाणन कार्यक्रम, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) आणि ब्लॉकचेन वार्षिक समिट यासह विविध उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. या कराराविषयी बोलताना, सुदर्शन रेड्डी मिनुमुला - सीईओ, IDS म्हणाले, "सिंबायोसिस सोबतची ही  भागीदारी दूरसंचार क्षेत्रातील ब्लॉकचेन अवलंबनाच्या वाढीस नक्कीच प्रोत्साहन देणारी ठरेल". वोरुगंती अरविंद-ग्लोबल उपाध्यक्ष-ब्लॉकचेन, आयडीएस म्हणाले, “सिंबायोसिस  येथील अप्लाइड ब्लॉकचेन केंद्र हे भारत ब्लॉकचेन युनिव्हर्सिटी इंडस्ट्री क्लस्टर (यूआयसी) चा भाग म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित  ५उपयोजित संशोधन केंद्रांपैकी एक आहे.”

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते यांनी व्यवस्थापन पदवीधरांसाठी तंत्रज्ञानाच्या भूमिकेचे महत्त्व नमूद केले आणि या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधन व नवकल्पना वाढीस लागेल अशी इच्छा व्यक्त केली. इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सी. ए. अभिजित चिरपुटकर यांनी SIDTM ने डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसी, २०१८ स्वीकारली आहे आणि तेव्हापासून विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षण देण्यासाठी संस्थेमध्ये विविध तंत्रज्ञानाच्या प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD