‘उत्पादन शुल्क’ची भरती लवकरच; जवान पदासाठी वयोमर्यादा वाढवली, मुलींनाही दिलासा

विभागाने पदभरतीबाबत दि. ३० मे रोजी जाहिरात दिली होती. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू केली होती. ही भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करून सुधारित भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘उत्पादन शुल्क’ची भरती लवकरच; जवान पदासाठी वयोमर्यादा वाढवली, मुलींनाही दिलासा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य उत्पादन शुल्क विभागातील (State Excise Department) विविध पदांची भरती (Recruitment) प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सुमारे ७०० हून अधिक पदांसाठी जाहिरात काढली जाणार असून त्यामध्ये सर्वाधिक ६५० पदे जवान या संवर्गातील आहेत. तसेच लघुलेखक, लघुटंकलेखक, चपराशी ही पदेही भरली जाणार आहेत.

 

विभागाने पदभरतीबाबत दि. ३० मे रोजी जाहिरात दिली होती. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू केली होती. परंतु जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करून सुधारित भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता लवकरच ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

इस्रायलमध्ये अडकले ९०० भारतीय विद्यार्थी; डॉक्टरेट, पदव्युत्तर पदवीचे घेतायेत शिक्षण

 

नव्याने काढण्यात येणाऱ्या जाहिरातीमध्ये जवान संवर्गातील ५७८ तर जवान-नि-वाहनचालक संवर्गातील ७३ पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या वयोमर्यादेमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार खुला व मागास प्रवर्गातील कमाल वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढविण्यात आली आहे. खुल्या गटातील उमेदवारांचे वय आता २८ वरून ३० वर्षे तर मागास प्रवर्गाचे वय ३३ वरून ३५ वर्षे करण्यात आले आहे.

 

यापुर्वीच्या जाहिरातीमध्ये महिला जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी वजनाची अट सेवा प्रवेश नियमातील तरतुदींनुसार ५० किललो होती. न्यायालयाचे आदेश व पोलीस विभागातील सेवा प्रवेश नियमातील तरतुंदीचा विचार करून महिला उमेदवारांसाठी असलेली किमान ५० किलो वजनाची अट रद्द करण्यात आली आहे.

 

ज्या उमेदवारांनी यापुर्वी दिलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केले आहेत, त्यांना पुन्हा नवीन जाहिरातीनुसार अर्ज अद्ययावत करण्याची मुभा देण्यात येणार आहे. जे उमेदवार नमूद वयोमर्यादेच्या अटींमुळे अपात्र होतील अथवा परीक्षा देण्यास इच्छूक नसतील त्यांचे शुल्क परत केले जाणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k