सीईटी सेलने 'या' अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचे पुण्यातील परीक्षा केंद्र बदलले

एमएएच एएसी सीईटी परीक्षा डी. वाय. पाटील काॅलेज ऑफ अप्लाईड आर्ट अँड क्राफ्ट, पुणे या महाविद्यालयामध्ये घेण्यात येणार आहे. 

सीईटी सेलने 'या' अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचे पुण्यातील परीक्षा केंद्र बदलले

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षातर्फे दृष्यकला पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएएच एएसी सीईटी परीक्षेचे (MAH AAC CET Exam) एमआयटी अॅकेडमी ऑफ इंजिनिअरींग, (MIT Academy of Engineering) पुणे येथील परीक्षा केंद्र बदलण्यात आले आहे. याऐवजी आता ही परीक्षा डी. वाय. पाटील काॅलेज ऑफ अप्लाईड आर्ट अँड क्राफ्ट, (D. Y. Patil College of Applied Art and Craft) पुणे या महाविद्यालयामध्ये घेण्यात येणार आहे. 

दृष्यकला पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून घेण्यात येणारी एमएएच एएसी सीईटी २०२४ परीक्षेत बदल करण्यात आले आहेत. नवीन सुधारीत वेळापत्रकानुसार १२ मे रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी १३ मे रोजी पुणे लोकसभा निवडणुक असल्यामुळे एमआयटी अॅकेडमी ऑफ इंजिनिअरींग, पुणे येथील परीक्षा केंद्र उपलब्ध होणार नाही, असे सीईटी कार्यालयास सदर महाविद्यालयाने अवगत केले आहे. त्यामुळे या गोष्टींचा फेरविचार करुन नवीन परीक्षा केंद्र देण्यात आहे. 

ज्या उमेदवारांना वरील परीक्षा केंद्र देण्यात आले होते, त्या सर्व उमेदवारांची प्रवेश परीक्षा ही (केंद्र क्र १४) डी. वाय. पाटील काॅलेज ऑफ अप्लाईड आर्ट अँड क्राफ्ट, पुणे या महाविद्यालायामध्ये घेण्यात येणार आहे. याबाबत उमेदवारांना ई-मेल व एसएमएसद्वारे कळविण्यात येईल, असे नमुद करणारी सुचना सीईटी सेलने अधिकृत संकेतस्थळ https://cetcell.mahacet.org वर प्रसिद्ध केली आहे.