आश्रम शाळेतील ३६ विद्यार्थ्यांना विषबाधा; चार जणांची प्रकृती गंभीर

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील येरली येथील आदिवासी आश्रमशाळा गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे. या आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण दिले जात आहे.

आश्रम शाळेतील ३६ विद्यार्थ्यांना विषबाधा; चार जणांची प्रकृती गंभीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

भंडाऱ्यात (Bhandara) आदिवासी आश्रम शाळेतील (Tribal Residential School) ३६ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यापैकी चौघांची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील येरली येथील आदिवासी आश्रमशाळा गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे. या आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण दिले जात आहे. तिथे सुमारे ३२५ विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहे.

झेडपी शाळांच्या इमारतींमधील मोकळ्या खोल्या अंगणवाडीसाठी! अजित पवारांचे निर्देश

गुरुवारी विद्यार्थ्यांना दुपारच्या सुमारास जेवण देण्यात आले. जेवणानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांच्या पोटात दुखायला लागले. तर, काहींना चक्कर आली. याची तक्रार विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांकडे केली. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

संध्याकाळी  विद्यार्थ्यांना पोटदुखी आणि उलटीचा त्रास अधिक जाणवू लागला. त्यामुळे सुरुवातीला या विद्यार्थ्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, हळूहळू विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. सुमारे ३६ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo