SBI लिपिक मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

परीक्षेचा निकाल स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकृत संकेतस्थळ sbi.co.in वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

SBI लिपिक मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

SBI Clerk Mains परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या लिपिक मुख्य परीक्षेचा (Clerk Main Exam) निकाल जाहीर (Results announced) करण्यात आला आहे. परीक्षेचा निकाल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India Recruitment) अधिकृत संकेतस्थळावर sbi.co.in उपलब्ध करून देण्यात आला आहे. एसबीआय क्लर्कची मुख्य परीक्षा 25 फेब्रुवारी ते 2 मार्च कालावधीत घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेला निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत ज्युनियर असोसिएटच्या एकूण 8 हजार 283 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची मुख्य निकालानंतर पडताळणी केली जाईल. SBI लिपिक मुख्य परीक्षेत 200 गुणांचे 190 प्रश्न विचारले गेले. ज्यामध्ये कॉम्प्युटर नॉलेज, रिझनिंग एबिलिटी या विभागातून 60 गुणांचे 50 प्रश्न विचारण्यात आले होते. येथे प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा होता. आता निकाल जाहीर झाला आहे. 

असा तपासा निकाल 

सर्व प्रथम sbi.co.in वर जा. होमपेजवर जा. त्यानंतर SBI Clerk Mains Result 2024 लिंकवर क्लिक करा. निकालाची PDF तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल. सर्च बार वर जा आणि आपले नाव किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा. तुमचे नाव यादीत दिसल्यास उमेदवार यशस्वी मानला जाईल. खाली डाउनलोड वर क्लिक करा आणि स्कोअर कार्ड तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करून प्रिंट काढून घ्या