IIT दिल्ली ने बनवले जगातील सर्वात सुरक्षित बुलेट प्रूफ जॅकेट

दिल्ली आयआयटीचे प्रा.  नरेश भटनागर यांनी हे जॅकेट  बनवले आहे.  ते गेल्या १५ वर्षांपासून या प्रोजेक्टवर काम करत आहेत.

IIT दिल्ली ने बनवले जगातील सर्वात सुरक्षित बुलेट प्रूफ जॅकेट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जगातील सर्वात घातक समजल्या जाणाऱ्या गन पैकी एक स्पायनर गनचे ६ शॉट सहज पचवू शकणारे, अमेरिका (America), चीन (China) सारख्या शक्तीशाली देशांच्या लष्कराकडे (Army) असणाऱ्या बुलेटप्रूफ जॅकेट (Bullet Proof Jacket) पेक्षा मजबूत आणि  तरीही तुलनेने वजनाने कमी असे बुलेटप्रूफ जॅकेट IIT दिल्लीने (IIT Delhi) बनवले आहे. येत्या दीड वर्षात भारतीय सैन्यदल हे जॅकेट वापरू शकणार आहे. 

दिल्ली आयआयटीचे प्रा.  नरेश भटनागर यांनी हे जॅकेट बनवले आहे. ते गेल्या १५ वर्षांपासून या प्रोजेक्टवर काम करत आहेत. याआधी, जेव्हा ते बनवण्यास सुरुवात झाली तेव्हा ते बीएस ५ मानकांनुसार बनवले जात होते, परंतु जेव्हा ते तयार झाले तेव्हा ते बीएस -६ मानकांची पूर्तता करत आहे. या बुलेट प्रूफ जॅकेट मध्ये एकावेळी ६ स्नायपर शॉट्स सहन करण्याची क्षमता आहे, म्हणजेच जर कोणी या बुलेट प्रूफ जॅकेटवर स्नायपर गनने गोळी झाडली, तर ६ बुलेटपर्यंत या जॅकेटला इजा होणार नाही आणि ते परिधान केलेल्या सैनिकालाही त्रास होणार नाही.

Research Park : IIT मुंबईसह देशातील आठ संस्थांमध्ये संशोधन पार्क

सध्या अमेरिका, चीन सारख्या बलाढ्य देशांसहित  जगातील कोणतेही सैन्य वापरत असलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये फक्त तीन स्नायपर शॉट्सचा सामना करण्याची क्षमता आहे.  हे बुलेट प्रूफ जॅकेट वजनाच्या बाबतीतही अतिशय कार्यक्षम बनवण्यात आले आहे.  याचे वजन इतर देश वापरत असलेल्या जॅकेट पेक्षा अडीच किलोने कमी आहे, त्यामुळे भारतीय सैन्याला या जॅकेटचा चांगला उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

या जॅकेट विषयी बोलताना प्रा. भटनागर म्हणाले, " आम्हाला ६ स्नायपर बुलेटचे टार्गेट लष्करानेच दिले होते. तथापि, चाचणी दरम्यान, आम्हाला आढळले की आम्ही या बुलेट प्रूफ जॅकेटवर स्नायपर गनमधून ८ गोळ्या झाडल्या तरीही बुलेट प्रूफ जॅकेट पूर्णपणे सुरक्षित आहे. या जॅकेटचे  तंत्रज्ञान पूर्णपणे तयार आहे. ते तयार करण्यासाठी  लवकरच कोटेशन मागवले जाणार आहे.   येत्या दीड वर्षात ते भारतीय  जवानांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo