NASA News : पुण्यातील ११ वर्षीय रोहनची 'नासा'मध्ये संशोधनासाठी निवड

अमेरिकेच्या नासा संस्थेतर्फे अंतराळ मोहिमांची रचना निर्मिती करून त्यात विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची संधी  दिली जाणारी 'क्यूब इन स्पेस प्रोग्राम' ही एक योजना आहे.

NASA News : पुण्यातील ११ वर्षीय रोहनची 'नासा'मध्ये संशोधनासाठी निवड
Rohan Bhansali

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील विद्या व्हॅली स्कूलमध्ये (Vidya Valley School) सहावीत शिकणारा रोहन भन्साळी (Rohan Bhansali) या विद्यार्थ्याला अमेरिकेच्या नासा (NASA) मध्ये संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. रोहनने एक क्यूब तयार केला असून क्यूबने स्ट्रॅटोस्फिअरमध्ये (Stratosphere) केलेल्या १२ तासांच्या प्रवासात प्रत्येक ५ मिनिटांनी यात माहिती गोळा करण्यात येणार आहे. अतिनील किरणांपासून अंतराळवीरांना कोणता पदार्थ जास्त संरक्षण देईल, हे जाणून घेण्यासाठी रोहनचे संशोधन महत्वाचे ठरणार आहे.

अमेरिकेच्या नासा संस्थेतर्फे अंतराळ मोहिमांची रचना निर्मिती करून त्यात विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची संधी  दिली जाणारी 'क्यूब इन स्पेस प्रोग्राम' ही एक योजना आहे. या योजनेअंतर्गत वास्तविक जगातील संबंधित समस्यांबाबत छोट्या पातळीवरील प्रयोग केले जातात. यातच ११ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना तळहातावर मावेल एवढा उपग्रह तयार करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. यामध्ये रोहनच्या प्रयोगाची निवड करण्यात आली आहे.

11th Admission : अकरावी प्रवेशाच्या नियमित फेऱ्या संपल्या, पहिली विशेष फेरी १७ जुलैपासून

सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या पदार्थांवर अतिनील किरणांचा होणारा परिणाम, हे मला जाणून घ्यायचे होते. तसेच अंतराळवीरांना दररोज छातीच्या एक्स-रेच्या तुलनेत ८ पट किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागत असल्याने, अंतराळवीरांना अतिनील किरणांपासून बचाव करण्याच्या दृष्टीने मी हा प्रोजेक्ट केला असल्याने रोहनने पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विज्ञानाची आवड असल्याने नासाच्या 'क्यूब इन स्पेस प्रोग्राम' या योजनेचा माहिती शिक्षकांकडून मिळताच मी अर्ज केला आणि माझी निवड झाली. हा क्यूब बनवण्यासाठी साधरण चार महिन्यांचा कालावधी लागल्याचेही त्याने सांगितले. रोहनसोबतच विद्या व्हॅली स्कूलच्या शाळेतील २७ विद्यार्थ्यांनी या प्रोग्रामसाठी अर्ज केला होता. त्यातील ८ विद्यार्थ्यांची नासाच्या प्रोग्रामसाठी निवड झाली आहे.

मला माझ्या या प्रोजेक्टमध्ये शिक्षकांची मदत आणि मार्गदर्शन वेळोवेळी लाभले. तसेच यासाठी कुटुंबातील सदस्यांचाही पाठिंबा मिळाला. हा प्रोजेक्ट करण्यासाठी  केलेल्या संशोधनात मला अंतराळातील अचंबित करणाऱ्या गोष्टी कळाल्या. मला विज्ञानाची आवड असल्याने भविष्यात वैज्ञानिक म्हणून काम करायचे आहे, असे रोहनने सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD