NIRF 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये मोठी घसरण; देशात ३५ व्या क्रमांकावर

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी सोमवारी सकाळी NIRF 2023 रँकिंग जाहीर केले. देशातील सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठांच्या वर्षभरातील कामगिरीच्या आधारे मंत्रालयाकडून हे रॅंकिंग दिले जाते.

NIRF 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये मोठी घसरण; देशात ३५ व्या क्रमांकावर
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या (Educational Institutes) क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) ओव्हरऑल रँकिंगमध्ये ३५ व्या तर विद्यापीठांच्या गटात १९ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. मागील वर्षी विद्यापीठ ओव्हरऑल गटात २५ व्या स्थानावर होते. २०२० मध्ये विद्यापीठ गटात पहिल्या दहामध्ये नवव्या क्रमांकावर असलेल्या विद्यापीठाची ही घसरण चिंता वाढवणारी आहे,असे असले तरी महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ अजूनही प्रथम क्रमांकावर आहे. नॅशनल इस्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये (NIRF 2023) विद्यापीठांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठाला एकूण सरासरी ५८.३१ गुण मिळाले आहेत. तर ओव्हरऑल गटात ५५.७८ गुण आहेत. (Savitribai Phule Pune University National Intitutional Ranking Framework 2023)

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी सोमवारी सकाळी NIRF 2023 रँकिंग जाहीर केले. देशातील सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठांच्या वर्षभरातील कामगिरीच्या आधारे मंत्रालयाकडून हे रॅंकिंग दिले जाते. २०१६ मध्ये एनआयआरएफला सुरूवात झाली. त्यावर्षी केवळ सुमारे साडे तीन हजार शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला होता. यावर्षी हा आकडा ८ हजार ६८६ एवढा आहे. देशात इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मद्रासने ओव्हरऑल रँकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

NEP 2020 Breaking News : संलग्न महाविद्यालयात अंमलबजावणी पुढील वर्षापासून

मागील तीन वर्षांपासून पुणे विद्यापीठाची क्रमवारी दरवर्षी घसरत चालली आहे. विद्यापीठ गटात २०२० मध्ये नऊ क्रमांकावर असलेले विद्यापीठ मागीलवर्षी १२ व्या क्रमांकावर होते. तर २०२१ मध्ये अकरावे स्थान मिळाले होते. त्यावेळी एकूण ५८.३४ एवढे होते. सर्व शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ देशात ३५ व्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी हा क्रमांक २५ वा होता. 

ही क्रमवारी ठरविताना देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, अभियांत्रिकी, महाविद्यालये, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, दंत वैद्यकीय, विधी, अर्किटेक्चर आणि कृषी असे एकूण १२ गट केले आहेत. हा दर्जा ठरविण्यासाठी संशोधन, सर्वसमावेशकता, पदवीधर विद्यार्थ्यांचे निकाल आणि संख्या आणि शिकविणे, शिकणे आणि संसाधने असे काही निकष ठरविले आहेत.

NIRF 2023 अधिकृत वेबसाइट - nirfindia.org

विद्यापीठाचे गुणपत्रक (विद्यापीठ गटात) ( प्रत्येकी १०० पैकी) -

TLR - ६६.९९

RPC - ३९.३०

GO - ९४.६३

OI - ५१.७८

 Perception - ४१.०७

मागील पाच वर्षांचे प्रगतीपुस्तक (क्रमांक) -

वर्ष          सर्वसाधारण गट    विद्यापीठ

२०१९       १७                    १०

२०२०       १९                   ९

२०२१      २०                    ११

२०२२      २५                    १२

२०२३      ३५                    १९

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo