मुंबई विद्यापीठ : प्रथम वर्ष पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; नोंदणीला सुरूवात 

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी https://muadmissionug.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर जाऊन करता येणार आहे. प्रक्रियेला सुरूवात झाली असून  १० जून ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.  

मुंबई विद्यापीठ : प्रथम वर्ष पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; नोंदणीला सुरूवात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या (Implementation of National Education Policy) अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ (Academic year 2024-2025) साठी ३ वर्ष आणि ४ वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या (3 year and 4 year degree courses) प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर (Pre-admission online registration schedule announced) केले आहे. मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असून १० जून ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.  

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी मुंबई विद्यापीठात बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए), बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc), बॅचलर ऑफ कॉमर्स (B.Com) आणि इतर अनेक पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अंतर्गत आलेल्या बीएमएस, बीबीए, बीसीए सारख्या अभ्यासक्रमांचे प्रवेश यंदा प्रथमच सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलद्वारे पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर घेण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी सर्व संलग्नित व स्वायत्त महाविद्यालयांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकाचे पालन करावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून करण्यात आले आहे. 

सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे 

विद्यार्थ्यांना २५ मे ते १० जून दुपारी १.०० वाजेपर्यंत संबधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज विक्री केले जातील. याच कालावधीत प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यानंतर १३ जून रोजी संध्याकाळी ५.०० वाजता पहिली मेरीट लिस्ट प्रसिद्ध केली जाईल. १४ जून ते २० जून दुपारी ३.०० वाजेपर्यंत ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणा करता येणार आहे. २१ जून रोजी संध्याकाळी ५.०० वाजता दुसरी मेरीट लिस्ट प्रसिद्ध केली जाईल. २२ जून ते २७ जून दुपारी ३.०० वाजेपर्यंत ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणा येणार आहे. २८ जून संध्याकाळी ५.०० वाजता तिसरी मेरीट लिस्ट प्रसिद्ध होणार आहे. २९ जून ते ०३ जुलै दुपारी ३.०० वाजेपर्यंत ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणा चालू राहिल.