शिक्षण उपसंचालकांची होणार चौकशी; राम सातपुते यांनी विधानसभेत उठवला आवाज

तत्कालीन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे आणि सोलापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांच्या चौकशीची मागणी आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत केली.

शिक्षण उपसंचालकांची होणार चौकशी; राम सातपुते यांनी विधानसभेत उठवला आवाज
MLA Ram Satpute

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शालार्थ आयडी देण्यापासून अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती पर्यंतच्या अनेक प्रकरणात पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक (Education Department) कार्यालयाच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाचे चौकशी करावी, अशी मागणी आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute) यांनी विधानसभेत केली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (School Education Minister Ram Satpute) यांनी ही मागणी मान्य करत चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना शिक्षण क्षेत्राशी निगडित असणाऱ्या अनेक तक्रारी सर्वसामान्य नागरिकांनी माझ्याकडे केल्या आहेत. शालार्थ आयडी, अनुकंपावरील नियुक्ती, शिक्षक मान्यता अशा अनेक विषयांचे दर ठरलेले आहेत.

Bogus Schools : बनावट प्रमाणपत्र देणारी गँग, SIT मार्फत चौकशी करण्याची विधानसभेत मागणी

ठरलेली रक्कम मोजल्याशिवाय नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे तत्कालीन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे आणि सोलापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांच्या चौकशीची मागणी आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत केली.

आमदार सातपुते यांनी संबंधित अधिकाऱ्यांबाबात लेखी तक्रार शिक्षण विभागाकडे द्यावी. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल, असे दीपक केसरकर यांनी सभागृहात सांगितले. त्यावर सभागृहात विधिमंडळ अध्यक्षांसमोर सांगत आहे, हीच तक्रार समजावी, असे  सातपुते यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD