SPPU NEWS :'पीएचडी अ‍ॅडमिशन अ‍ॅण्ड ट्रॅकिंग' साठी विद्यापीठाकडून स्वतंत्र पोर्टल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या हस्ते 'पीएचडी अ‍ॅडमिशन अ‍ॅण्ड ट्रॅकिंग' पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.

SPPU NEWS :'पीएचडी अ‍ॅडमिशन अ‍ॅण्ड ट्रॅकिंग' साठी विद्यापीठाकडून स्वतंत्र पोर्टल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (Savitribai Phule Pune University) पीएचडी (PHD) करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे.त्यामुळेच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या शंकाचे निरसण करण्यासाठी विद्यापीठाकडून 'पीएचडी अ‍ॅडमिशन अ‍ॅण्ड ट्रॅकिंग'या (PhD Admission and Tracking)स्वतंत्र पोर्टलची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान,विद्यापीठातर्फे पीएच.डी.प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा (Pre-Entrance Examination) येत्या एप्रिल महिन्यात घेतली जाणार असून येत्या आठवड्याभरात त्याबाबतचे वेळापत्रक प्रसिध्द केले जाण्याची शक्यता आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या हस्ते 'पीएचडी अ‍ॅडमिशन अ‍ॅण्ड ट्रॅकिंग' पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे आदी  उपस्थित होते.'Ph.D. Admission and Tracking Portal' ही या पोर्टलची लिंक आहे. पीएचडीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या पोर्टलचा लाभ घ्यावा,असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे

या पोर्टलवर पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेसह ,अ‍ॅडमिशन ,कोर्स, पात्रते आणि शुल्कासंबंधी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या पोर्टलद्वारे पूर्व परीक्षा, अ‍ॅडमिशन, अपलोड केलेले कागदपत्र, थिसीस, शिष्यवृत्ती या संबधिची सर्व  माहिती विद्यार्थ्यांना ट्रॅक करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पीएच.डी.चा प्रवास अधिक सोपा होणार आहे.

फॉर्म भरण्यापासून ते डिक्लेरेशन पर्यंतच्या सर्व प्रक्रिया या एकाच पोर्टलवरती करता येणार आहेत. तसेच या पोर्टलवर तुम्हाला तुमच्या विषयासाठी उपलब्ध असलेल्या गाईड, रिसर्च सेंटरची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. या पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे पोर्टल वापरण्यासाठी कुठलेही रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन करण्याची गरज नाही.त्यामुळे हे पोर्टल पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे,असे विद्यापीठातर्फे कळवण्यात आले आहे.