CBSE Result : दहावीचा निकाल जाहीर; येथे पाहता येणार निकाल

इयत्ता बारावीचा निकाल सकाळी जाहीर केल्यानंतर मंडळाने काही वेळापुर्वीच दहावीचा निकालही जाहीर केला आहे.

CBSE Result : दहावीचा निकाल जाहीर; येथे पाहता येणार निकाल
CBSE 10th Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळमार्फत (CBSE) २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा (10th Result) निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसईने विविध संकेतस्थळावर व मोबाईल ॲप द्वारे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यास उपलब्ध करून दिला आहे. यंदा विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.१२ टक्के असून कोविडच्या आधीच्या वर्षापेक्षा जास्त आहे. २०१९ मध्ये दहावीचा निकाल ९१.१० टक्के होता.

मागील वर्षाच्या तुलनेत निकालात १.२८ टक्क्यांनी घट झाली आहे. सीबीएससी तर्फे १५ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी २१ लाख ८४ हजार ११७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २१ लाख ६५ हजार ८०७ विद्यार्थी परीक्षेत बसले, यामधील २१ लाख १६ हजार ७७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विभागनिहाय निकाल खालीलप्रमाणे - त्रिवेंद्रम ९९.९१, बेंगलुरू ९९.१८, चेन्नई ९९.१४, अजमेर ९७.२७, पुणे ९६.९२, पटना ९४.५७, चंदीगढ ९३.८४, भुवनेश्वर ९३.६४, प्रयागराज ९२.५५ नोएडा ९२.५०, पंचकुला ९२.३३, भोपाळ ९१.२४, दिल्ली वेस्ट  ९०.६७, डेहराडून ९०.६१, दिल्ली ईस्ट ८८.३०, गोहावाटी ७६.९०

या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध -

https://www.cbse.gov.in

https://www.result.nic.in

https://www.results

https://results.digilocker.gov.in

https://umang.gov.in