UPSC Result : देशातील शंभर टॉपर्सची नावे पहा एका क्लिकवर, मुलींनी मारली बाजी

यूपीएससीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून पहिल्या शंभर जणांमध्ये ४० हून अधिक मुली आहेत. तर पहिल्या दहामध्ये चार मुली आहेत.

UPSC Result : देशातील शंभर टॉपर्सची नावे पहा एका क्लिकवर, मुलींनी मारली बाजी
Ishita Kishor, Garima Lohia, Uma Harathi N

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा 2022 चा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये मुलींनी बाजी मारल्याचे दिसते. पहिल्या २५ क्रमांकांमध्ये चौदा मुलींचा समावेश आहे. तर ९३३ जणांच्या यादीत पहिल्या शंभरात ४० हून अधिक मुली आहेत. 

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. देशातून इशिता किशोर (Ishita Kishor) हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यानंतर गरिमा लोहिया (Garima Lohia), उमा हरती एन, स्मृती मिश्रा यांचा क्रमांक लागतो. मुलांमध्ये मयूर हजारिका याने प्रथम क्रमांक पटकावला असून तो यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि केंद्रीय सेवांमधील गट क व गट ख मधील पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. आयोगाने ९३३ उमेदवारांची या पदांसाठी शिफारस केली आहे. परीक्षेचा निकाल  http//www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

दरम्यान, नागरी सेवा पूर्व परीक्षा ५ जून रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी ११ लाख ३५ हजार ६९७ उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यापैकी ५ लाख ७३ हजार ७३५ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३ हजार ९० विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. ही परीक्षा १६ ते २५ सप्टेंबर दरम्यान झाली. या परीक्षेतून मुलाखतीसाठी २ हजार ५२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या १८ मेपर्यंत मुलाखती पार पडल्या. त्यानंतर पाच दिवसांतच अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2