MPSC PSI गट-ब मुख्य परीक्षा - २०२३ पोलीस उपनिरीक्षक निकाल प्रसिध्द 

मुख्य परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह, नावे आणि गुणांची यादी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC PSI गट-ब मुख्य परीक्षा - २०२३ पोलीस उपनिरीक्षक निकाल प्रसिध्द 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) ५ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा- २०२३ मधील पोलीस उपनिरीक्षक (Group-B Service Main Exam- Sub-Inspector of Police in 2023) पदाचा निकाल जाहीर (Results announced) करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह, नावे आणि गुणांची यादी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. आयोगाच्या अटींनुसार उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. अर्जात प्राविण्यप्राप्त खेळाडूचा दावा केलेल्या उमेदवारांनी क्रीडा प्रमाणपत्र व सदर क्रीडा विषयक प्रमाणपत्र गट-ब पदाकरिता वैध ठरत असल्याबाबतचा संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांचा, क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल मुलाखतीच्या वेळेस सादर करणे अनिवार्य राहील.

मुख्य परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जाद्वारे सादर केलेले दावे/अर्हतेच्या आधारेच निवडीसाठी पात्रता असणार आहेत. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. परीक्षेचा निकाल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने म्हटले आहे. शारीरिक चाचणी पावसाळा संपल्यानंतर घेण्यात येईल. शारीरिक चाचणीची तयारी करण्याबाबत उमेदवारांना साधारणपणे १ महिन्यापुर्वी सूचना देण्यात येणार आहे. शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येईल. याबाबतचा सविस्तर तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयाोगाकडून प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.