MPSC मधील अपयशातूनच सापडली ‘सुरक्षित’ आयुष्याची वाट; प्रवीण ढोकलेंची प्रेरणादायी वाटचाल

ढोकले मूळचे पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील करंदी गावचे आहेत. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे घरच्यांनी त्यांना शाळेनंतर पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला पाठवले होते.

MPSC मधील अपयशातूनच सापडली ‘सुरक्षित’ आयुष्याची वाट; प्रवीण ढोकलेंची प्रेरणादायी वाटचाल
Praveen Dhokle

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

MPSC परीक्षेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो. पण अपेक्षित यश (Success in Career) हाती लागत नव्हते. शेवटी ७ वर्षानंतर वेगळे क्षेत्र निवडायचे ठरवले, तशी तयारीसुद्धा सुरु केली. पण माझ्या निर्णयावर ठाम राहत नवीन मार्ग स्वीकारणे खूप अवघड गेले. आज पुण्यासारख्या (Pune) शहरात स्वतःची सिक्युरिटी एजन्सी चावलतो, यशस्वी व्यावसायिक (Entrepreneur) आहे, आता या क्षणाला मला माझ्या निर्णयाचे अजिबात वाईट वाटत नाही, अशी भावना 'P4S टास्क फोर्स इंडिया लिमिटेडचे संचालक प्रवीण ढोकले (Pravin Dhokle) यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना व्यक्त केली.

ढोकले मूळचे पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील करंदी गावचे आहेत. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे घरच्यांनी त्यांना शाळेनंतर पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला पाठवले. पुण्यात गरवारे आणि मॉडर्न महाविद्यालयातून ढोकले यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली.

'प्लॅन ए' फसला तरी उमेश घाडगे मागे हटले नाहीत; MPSC च्या विद्यार्थ्यांना मदत करत बनले यशस्वी उद्योजक

त्यांच्या या प्रवासाबद्दल बोलताना ढोकले म्हणाले, "स्पर्धा परीक्षा देताना त्याच्या खर्चाचा बोजा घरच्यांवर टाकायचा नाही, हे ठरवले होते. सुरुवातीला आम्ही दोन-तीन मित्रांनी एकत्र येत एक हॉस्टेल सुरु केले. त्यातून महिन्याला १० ते १२ हजार रुपये मिळत होते. त्यातून परीक्षेचा खर्च भागवत होतो. तब्बल ७ वर्ष परीक्षेत यश यावे म्हणून प्रयत्न करत होतो. मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचलो होतो, पण यश गवसले नाही."

Pune News : स्पर्धा परीक्षेत अपयश आले अन् वेळीच बदलला ट्रॅक; 'प्लॅन बी'मुळे योगेश बनला उद्योजक

ढोकले सांगत होते, "एकीकडे वाढते वय, वाढत्या जबाबदाऱ्या या गोष्टींचा विचार करून मी माझ्या करिअरचे क्षेत्र बदलण्याचा निर्णय घेतला. मधल्या वेळेत होस्टेलचे काम सुरूच होते. पण MPSC मधून बाहेर पडण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप अवघड होता. यातून मानसिकदृष्ट्या बाहेर पडायला मला दोन वर्ष लागली. त्या दरम्यान संरक्षण क्षेत्राशी निगडित एका व्यक्तीशी माझी ओळख झाली. आम्ही चांगले मित्र झालो. आम्ही दोघांनी मिळून सिक्युरिटी एजन्सी सुरु केली. पुढे २०२० मध्ये मी स्वतःची एजन्सी सुरु केली." ढोकले यांच्याकडे आता ३६७ सुरक्षा कर्मचारी आहेत. पुणे, नवी मुंबई, नांदेड अशा विविध शहरांमध्ये ते सेवा पुरवत आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo