MBBS, BDS Admission : रिक्त जागांवर प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू, निवड झाल्यास प्रवेश बंधनकारक

एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाच्या तीन नियमित फेऱ्या पुर्ण झाल्या आहेत. सीईटी सेलकडून आजपासून स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडला सुरूवात करण्यात आली आहे.

MBBS, BDS Admission : रिक्त जागांवर प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू, निवड झाल्यास प्रवेश बंधनकारक
MBBS/BDS Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या (MBBS/BDS Admission) रिक्त जागांवर प्रवेशासाठीची प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (CET Cell) सुरू करण्यात आली आहे. सीईटी सेलकडून आजपासून (दि. २१) ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांना दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री११.५९ पर्यंत ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविता येतील.

 

एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाच्या तीन नियमित फेऱ्या पुर्ण झाल्या आहेत. सीईटी सेलकडून आजपासून स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडला सुरूवात करण्यात आली आहे. कक्षाने प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकानुसार शुक्रवार (दि. २२) पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविता येतील. तर दि. २३ सप्टेंबर रोजी निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

ऑनलाईन व दुरस्थ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेताय..मग ही काळजी घ्या! युजीसीने केले सतर्क

 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात दि. २४ ते २९ सप्टेंबर या कालावधीत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल. या फेरीनंतरही रिक्त जागा राहिल्यास दुसरा स्ट्रे राऊंड घेतला जाणार आहे. त्यासाठी दि. २९ सप्टेंबर रोजी निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दि. २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.

 

नीट युजी २०२३ मध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी, ज्यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे, मात्र तीन नियमित फेऱ्यांपर्यंत प्रवेशासाठी निवड झालेली नाही, असे विद्यार्थी या दोन फेऱ्यांसाठी पात्र आहेत. तर पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या फेऱ्यांमध्ये सहभाग घेता येणार नाही. या फेऱ्यांसाठी नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

 

तिसऱ्या फेरीत नोंदविलेले पसंतीक्रम ग्राह्य धरले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांना नव्याने पसंतीक्रम नोंदवावे लागतील. या फेऱ्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या महाविद्यालयांचेच पसंतीक्रम नोंदवावेत, असे कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j