ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कॉलेज सुरू करण्याचे UGC चे आदेश 

विद्यापीठांचे शैक्षणिक सत्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या UGC ने सर्व विद्यापीठांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रथम वर्ष पदवीपूर्व वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कॉलेज सुरू करण्याचे UGC चे आदेश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवीन शैक्षणिक वर्ष (New academic year)सुरु होण्याच्या पार्शवभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) ने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील पत्र UGC ने देशातील सर्व विद्यापीठांना पाठवले आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठांनी (All universities)ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (In the first week of August)कॉलेज सुरू (Start college) करावे,असे निर्देश दिले आहेत.

कोरोनामुळे शैक्षणिक कॅलेंडर विस्कळीत झाले आहे. त्यामुळे विद्यापीठांचे शैक्षणिक सत्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या UGC ने सर्व विद्यापीठांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रथम वर्ष पदवीपूर्व वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचा हवाला देत यूजीसीने विद्यापीठांना त्यांचे शैक्षणिक कॅलेंडर लवकर प्रसिध्द करण्यास सांगितले आहे. जेणेकरून संस्थेचे व संलग्न महाविद्यालयांचे शैक्षणिक उपक्रम वेळेत पार पाडता येतील. शैक्षणिक सत्र पुन्हा रुळावर आणण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोगाने मागील पदवी वर्गांचे निकाल जूनच्या अखेरीस जाहीर करण्याची सूचनाही केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी UGC ने  सर्व विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांमधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचनाही दिल्या होत्या. व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील प्रकल्पाचे काम आणि इंटर्नशिप आदी बाबी लक्षात घेऊन आयोगाने आणखी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. पदवीसह पदव्युत्तर वर्ग सुरू करण्याची सूचनाही आयोगाने केली आहे.