Manipur : मणिपूर दंगलीमुळे तब्बल १४ हजार शालेय विद्यार्थी विस्थापित

मागील काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये दंगल भडकली आहे. त्यानंतर अनेक कुटुंबांनी घरे सोडून स्थलांतर केले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे.

Manipur : मणिपूर दंगलीमुळे तब्बल १४ हजार शालेय विद्यार्थी विस्थापित
Manipur Violence Representaive image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीचा (Manipur Riots) दुष्परिणाम तिथल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात भोगावा लागत आहे. तेथील महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांचे (School Students) यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मणिपूरच्या शिक्षण मंत्री अन्नपूर्णा देवी (Education Minister Annapurna Devi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण १४ हजार ७६३ शालेय विद्यार्थी विस्थापित झाले आहेत. समाधानाची बाब म्हणजे यातील सुमारे ९३ टक्के विद्यार्थ्यांनी त्यांच्या मदत शिबिराच्या जवळच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. (14 thousand school students displaced due to Manipur Riots)

मागील काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये दंगल भडकली आहे. त्यानंतर अनेक कुटुंबांनी घरे सोडून स्थलांतर केले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे. याविषयी सांगताना अन्नपूर्णा देवी म्हणाल्या, "मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून आमच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. प्रत्येक मदत शिबिरात मुलांच्या प्रवेशासाठी एक नोडल अधिकारी नेमण्यात आला आहे. त्यापैकी ९३ टक्के मुलांना जवळच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात आला आहे."

SPPU News : परीक्षांचे निकाल लागले; विद्यापीठाची गाडी आली रूळावर

मणिपूरमध्ये ३ मे रोजी आदिवासी एकता मोर्चाच्या निषेधार्थ सुरू झालेल्या हिंसाचारात १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कित्येक घराची जाळपोळ झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे दाखले इतर कागदपत्रेही नष्ट झाले आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे.

दरम्यान, देशातील दिल्ली, कर्नाटक, आसाम, केरळ अशा अनेक राज्यांनी मणिपूरच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली आहे. तिथल्या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात सहज प्रवेश घेता यावे म्हणून या राज्यातील शिक्षण विभागाने प्रवेशाचे नियम शिथिल केले आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी दाखल किंवा इतर कागदपत्रांची सक्ती करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘आयआयटी’मध्ये शिकण्याची संधी

दिल्लीच्या शिक्षण विभागाने हिंसाचाराने प्रभावित झालेल्या मणिपूरमधील मुलांना तात्पुरते प्रवेश देण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कर्नाटक  सरकारने एक आदेश जारी केला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे कि, "मणिपूरमधील इयत्ता १ ते १० पर्यंतचे विद्यार्थी, जे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्य अभ्यासक्रमानुसार शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात, त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे नसल्यास, त्यांचे अर्ज विशेष मानले जातील.  त्यांना जन्म प्रमाणपत्र, हस्तांतरण प्रमाणपत्र किंवा इतर कोणतेही दस्तऐवज प्रदान करण्याची सक्ती न करता त्यांची नोंदणी करावी."

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD