विद्यापीठांच्या परीक्षा आणि निकालांसाठीही खाजगी कंपन्या?

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी मुंबई विद्यापीठातील विविध अडचणींचा आढावा घेतला.

विद्यापीठांच्या परीक्षा आणि निकालांसाठीही खाजगी कंपन्या?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी मंगळवारी मुंबई विद्यापीठातील (Mumbai University) विविध अडचणींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी परीक्षांचे नियोजन व निकालाबाबत कालबध्द पध्दतीने नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. त्यासाठी खाजगी कंपन्यांची मदत लागली तर त्याबाबतही आराखडा तयार करावा आणि वेळेत परीक्षेचे निकाल जाहीर करावेत, असेही सुचविले आहे. त्यामुळे आता विद्यापीठांच्या परीक्षा व निकालातही खाजगी कंपन्या येणार का, असा प्रश्न उपस्थित  झाला आहे. (University Exams)

 

मुंबईत झालेल्या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरू अजय भामरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

SPPU News : विद्यापीठाकडून नव्या कुलसचिवांच्या शोधाला सुरूवात

 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंवाद या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त देण्यात आले आहे. बैठकीत बोलताना पाटील म्हणाले की, मुंबई विद्यापीठाची विद्यार्थी संख्या जास्त आहे. परीक्षेचे नियोजन, निकाल वेळेत जाहीर करणे. याबाबत कालबद्ध पद्धतीने  नियोजन करावे. यासाठी खासगी कंपन्यांची मदत लागली, तर त्या बाबतही आराखडा तयार करावा आणि वेळेत परीक्षेचे  निकाल जाहीर करावेत. प्राध्यापक भरती प्रक्रियेला गती देऊन तातडीने याबाबत जाहिरात प्रसिद्ध करावी.

 

बैठकीत शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अडचणी, विद्यार्थी डेटा, डॅशबोर्ड, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थी हितासाठी उत्तम शैक्षणिक सुविधांसह गुणवत्ता आणि दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पाटील यांनी बैठकीत दिल्या.

 

दरम्यान, राज्यात सध्या विविध सरळसेवा भरती परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू आहे. या सर्व परीक्षा खाजगी कंपन्यांमार्फत घेतल्या जात आहे. परीक्षा घेण्यापासून निकालापर्यंतची सर्व कामे या कंपन्यांकडून केली जात आहे. प्रत्येक परीक्षेत हायटेक कॉपीचे प्रकार समोर आले असून पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत पाटील यांनी खाजगी कंपन्यांची मदत घेण्याची दिलेल्या सुचनेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k