UGC NET : नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ६ ते १४ डिसेंबरदरम्यान होणार परीक्षा

एनटीएकडून परीक्षेसाठीचे केंद्र निश्चित केलेल्या शहरांची माहिती परीक्षेच्या दहा दिवस आधी प्रसिध्द केली जाणार आहे. एनटीएच्या www.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली जाणार आहे.

UGC NET : नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ६ ते १४ डिसेंबरदरम्यान होणार परीक्षा
UGC-NET

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत युजीसी-राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC-NET) ही परीक्षा डिसेंबर २०२३ मध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार दि. ६ ते १४ डिसेंबर या कालावधी ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे. यापूर्वी जून २०२३ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.

 

'एनटीए'कडून परीक्षेसाठीचे केंद्र निश्चित केलेल्या शहरांची माहिती परीक्षेच्या दहा दिवस आधी प्रसिध्द केली जाणार आहे. 'एनटीए'च्या www.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली जाणार आहे. उमेदवारांनी परीक्षेविषयी अद्ययावत माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन 'एनटीए'कडून करण्यात आले आहे.

क्लस्टर युनिव्हर्सिटीचा मार्ग मोकळा; राज्य मंत्रिमंडळाकडून मार्गदर्शक तत्वांना मंजुरी

 

दरम्यान, 'एनटीए'कडून प्रसिध्द करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दि. ६ डिसेंबर रोजी दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे. पहिल्या सत्रात इंग्रजी, हिंदू स्टडीज, कोकणी व इतर काही परिकीय भाषांची परीक्षा असेल. तर दुसऱ्या सत्रात इतिहास, मणिपुरी, जर्मन, सिंधी या विषयांच्या परीक्षा असतील.

 

वाणिज्य विषयाची परीक्षा दि. ७ डिसेंबरला पहिल्या सत्रात तर शारीरिक शिक्षण, भारतीय संस्कृती, संगीत, फ्रेंच, संगणकशास्त्र आदी विषयांच्या परीक्षा दुसऱ्या सत्रात नियोजित आहेत. अशाचप्रकारे दररोज दोन सत्रांमध्ये विविध विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

 

सविस्तर वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO