Cluster University : राज्य सरकारच्या विद्यापीठांवरील भार होणार कमी : राजेश पांडे 

पुणे एज्युकेशन हब होण्यासाठी या निर्णयाचा नक्की फायदा होईल पुणे एज्युकेशन फोरमच्या वतीने आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो, असे राजेश पांडे म्हणाले.

Cluster University : राज्य सरकारच्या विद्यापीठांवरील भार होणार कमी : राजेश पांडे 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर समूह विद्यापीठे अर्थात क्लस्टर युनिव्हर्सिटी (Cluster University) स्थापन करण्याच्या मार्गदर्शक तत्वांना मंजुरी देण्याच्या राज्य सरकारच्या (Maharashtra Government) निर्णयाचे पुणे एज्युकेशन फोरमचे (Pune education forum) अध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande) यांनी स्वागत केले आहे. क्लस्टर विद्यापीठांमुळे राज्य सरकारच्या विद्यापीठांवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे ,असे मत पांडे यांनी व्यक्त केले आहे.

पांडे म्हणाले, या निर्णयामुळे शिक्षणाच्या संधीचे द्वार खुले झाले आहे. शिक्षणाच्या संधी सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, शिक्षणामध्ये प्रयोगशीलता आणण्यासाठी आणि शैक्षणिक विस्तारासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.

क्लस्टर युनिव्हर्सिटीचा मार्ग मोकळा; राज्य मंत्रिमंडळाकडून मार्गदर्शक तत्वांना मंजुरी

 पुणे एज्युकेशन हब होण्यासाठी या निर्णयाचा नक्की फायदा होईल.पुणे एज्युकेशन फोरमच्या वतीने आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. अधिकाधिक शैक्षणिक संस्था समूह विद्यापीठाच्या योजनेत सहभागी होतील, असा विश्वास वाटतो, असेही पांडे यांनी नमूद केले. 'राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने समूह विद्यापीठासंदर्भात नियमावली प्रसिद्ध केली होती. पुणे एज्युकेशन फोरमने परिसंवादाचे आयोजन करून शिक्षण तज्ज्ञांच्या हरकती आणि सूचना पाठविल्या होत्या,' अशी माहिती पांडे यांनी दिली.

क्लस्टर विद्यापीठे स्वतंत्रपणे काम करतील

देशातील उच्च शिक्षणाचा दर (जीईआर) पुढील काळात 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी क्लस्टर विद्यापीठांची निश्चितच मदत होईल. तसेच शासनाच्या नियंत्रणात राहूनही क्लस्टर विद्यापीठांना स्वायत्त व स्वतंत्रपणे काम करता येईल.
- राजेश पांडे, अध्यक्ष, पुणे एज्युकेशन फोरम

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO