JEE मेन परीक्षेचे हॉल तिकीट जारी ; असेे करा डाऊनलोड 

विद्यार्थी  jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन JEE मेन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

JEE मेन परीक्षेचे हॉल तिकीट जारी ; असेे करा डाऊनलोड 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य २०२४ B.Arch, B.Plan सत्र १ परीक्षेसाठी प्रवेशपत्र ( हॉल तिकीट) उपलब्ध करून दिले आहेत. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या पेपर २ साठी प्रविष्ट झालेले विद्यार्थी  jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन JEE मेन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी त्यांचा JEE मुख्य अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरू शकतात. JEE मुख्य पेपर 2 A मध्ये एकूण ८२ प्रश्न असतील ज्यात सामान्य ज्ञान ५० प्रश्न, गणिताचे ३० आणि ड्रॉइंगचे २ प्रश्न असतील. पेपर 2 B मध्ये जनरल अ‍ॅप्टिट्यूडमधून ५० प्रश्न, गणिताचे ३० आणि मॅनेजमेंट विषयावर २५ प्रश्न विचारले जातील.

JEE Mains Admit Card 2024 डाउनलोड कसे करायचे?

* jeemain.nta.ac.in 2024 या वेबसाइटला भेट द्या.

* प्रवेशपत्रासाठी उपलब्ध लिंकवर क्लिक करा.

* अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.

* तुमच्या स्क्रीनवर जेईई मेन्स अॅडमिट कार्ड दिसेल.

* ते डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.