राज्यात आणखी दोन खासगी विद्यापीठे; डीईएस, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठांचा मार्ग मोकळा

अधिवेशनात डेक्कन एज्युकेशन सोसायटी (DES) पुणे विद्यापीठ  आणि एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ या दोन खाजगी विद्यापीठांना मंजुरी देण्यात आली आहे.

राज्यात आणखी दोन खासगी विद्यापीठे; डीईएस, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठांचा मार्ग मोकळा
Private Universities

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

‘एज्युकेशन हब’ (Education Hub) म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात आता आणखी एका खासगी विद्यापीठाची (Private Universities) भर पडणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly) राज्यात दोन नवीन स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठांच्या विधेयकांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी एक विद्यापीठ पुण्यातील असल्याने आता पुणे जिल्ह्यातील एकूण खाजगी विद्यापीठांची संख्या १६ झाली आहे.

अधिवेशनात डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे विद्यापीठ (DES Pune Universities),  आणि एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, सोलापूर (MIT Vishwaprayag University) या दोन खाजगी विद्यापीठांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्यभरात, शैक्षणिक संस्थांमध्ये स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठे स्थापन करण्याकडे कल वाढला आहे. विशेषत: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही वर्षांत खासगी विद्यापीठांच्या संख्येत वाढ झाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) माहितीनुसार, राज्यात सध्या २२ हून अधिक खासगी विद्यापीठे असून, त्यापैकी १२ विद्यापीठे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कार्यरत आहेत.

SPPU News : प्र-कुलगुरू नियुक्ती हा राजकीय निर्णय की शैक्षणिक? चर्चेला तोंड फुटले

दरम्यान पुणे आणि परिसरात मागील वर्षभरात पिंपरी चिंचवड विद्यापीठ, JSPM विद्यापीठ, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ या तीन खाजगी विद्यापीठांना मान्यता देण्यात आली होती. डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस)  आणि एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ या दोन खाजगी विद्यापीठांना मान्यता देण्यात आल्यामुळे आता पुणे आणि परिसरात १६ खाजगी विद्यापीठे आहेत. एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ सोलापूर मधील आहे.

दरम्यान, दोन्ही विद्यापीठांच्या विधेयकांना विधीमंडळात मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर राज्यपालांची सही होईल. त्यानंतर राज्य शासनाची एक समिती प्रस्तावित विद्यापीठाची पाहणी करून त्यानंतरच विद्यापीठांच्या अंतिम मान्यतेवर शिक्कामोर्तब होईल. पण ही केवळ औपचारिकता असून पुढील काही दिवसांत दोन्ही विद्यापीठांना अंतिम मान्यताही मिळेल.

विधीमंडळात विद्यापीठांशी संबंधित मंजूर विधेयक -

  • डीईएस पुणे विद्यापीठ, पुणे, विधेयक, (स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ)
  • एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, पुणे, विधेयक, (स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ)
  • महाराष्ट्र पशु व मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठ (सुधारणा) विधेयक
  • महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, (विद्यापीठाकडून शासनास अहवाल सादर करण्याचा कालावधी निश्चित करण्याकरीता मुख्य अधिनियमाच्या कलम35 व कलम 37 यांमध्ये योग्य त्या सुधारणा करण्याकरीता) 
  • लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान (एलआटी) विद्यापीठ, नागपूर विधेयक, 2023 (विद्यापीठ स्थापन करणे व विधि संस्थापित करणे)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD