कॅम्पस प्लेसमेंट : कोणाला मिळाले ३.७ कोटी रुपयांचे पॅकेज

पहिल्या दिवशी ५९ कंपन्यांनी एकूण १६४ ऑफर दिल्या आहेत. यापैकी ११ जणांना १ कोटी रुपयांच्या वार्षिक वेतन पॅकेजची ऑफर मिळाली आहे.  

कॅम्पस प्लेसमेंट : कोणाला मिळाले ३.७ कोटी रुपयांचे  पॅकेज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशातील सर्व इंडिअन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी  (IIT)  मध्ये शैक्षणिक सत्र 2023-24 साठी कॅम्पस प्लेसमेंट (campus placement) फेरी नुकतीच सुरू झाली. पहिल्याच दिवशी आयआयटीमधील बीटेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीपूर्वीच करोडो रुपयांच्या वार्षिक पॅकेज ऑफर मिळाल्या आहेत. आयआयटी दिल्ली, बॉम्बे, खरगपूर, रुरकी, गुवाहाटी (IIT Delhi, Bombay, Kharagpur, Roorkee, Guwahati) आणि इतर आयआयटीमध्ये कोट्यवधी रुपयांची आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट पॅकेजेस ऑफर (International Placement Packages Offer) करण्यात आली आहेत. आयआयटी दिल्लीतील करिअर सर्व्हिसेसचे संचालक प्रोफेसर आर अथोथिरामन (Professor R Athothiraman, Director of Career Services, IIT Delhi) यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा : उत्तरपत्रिकेत कामसूत्रच्या कथा आणि प्राध्यापकांना शिव्या ; विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

अथोथिरामन म्हणाले, " जेन स्ट्रीट कॅपिटल ही सर्वाधिक पॅकेज देणारी कंपनी IIT मुंबई मध्ये पोहोचली आहे. या कंपनीने  सप्टेंबरमध्ये IIT मध्ये वार्षिक ३.७ कोटी रुपयांचे सर्वोच्च कॅम्पस प्लेसमेंट पॅकेज ऑफर केले होते. IIT मुंबई मध्ये पहिल्या दिवसाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना करोडो रुपयांच्या ऑफर मिळाल्या आहेत. १५ डिसेंबरपर्यंत सुमारे ३५० कंपन्या येतील,अशी व्यवस्थापनाची अपेक्षा आहे. प्लेसमेंट फेरीत २०० हून अधिक प्री-प्लेसमेंट ऑफर प्राप्त झाल्या आहेत. पहिल्या दिवशी PSU, HPCL, C-DOT, ONGC आणि इतर कंपन्यांनी सहभाग घेतला."

ही बातमी वाचली का : स्पर्धा परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक केल्यास १० कोटी रूपये दंड ; जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद

अथोथिरामन म्हणाले, "IIT गुवाहाटीमध्ये पहिल्या दिवशी ५९ कंपन्यांनी एकूण १६४ ऑफर दिल्या आहेत. यापैकी ११ जणांना १ कोटी रुपयांच्या वार्षिक वेतन पॅकेजची ऑफर मिळाली आहे.  कॅम्पस प्लेसमेंटच्या आधी, IIT गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांना २१४ 'प्री-प्लेसमेंट' ऑफर मिळाल्या आहेत.  " या वर्षी कंपन्या व्हर्च्युअल आणि फिजिकल पद्धतीने कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभागी होत आहेत. पहिल्याच दिवशी काही तासांतच ४८० विद्यार्थ्यांना (प्री-प्लेसमेंटसह) पूर्णवेळ जॉब प्लेसमेंट ऑफर मिळाल्या आहेत. यापैकी २५ विद्यार्थ्यांना विविध देशांतून  आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट पॅकेज ऑफर करण्यात आले आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट, गोल्डमन सॅक्स आणि टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स या कंपन्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना हाँगकाँग, जपान, नेदरलँड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समध्ये काम करण्याची संधी मिळेल," असेही अथोथिरामन म्हणाले.