Podar International School : ‘आरटीई’ प्रवेशातून ५३ पालकांची फसवणूक

शाळेचे सहायक व्यवस्थापक स्वानंद चंद्रकांत कुलकर्णी यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.  शाळेच्या अकाउंटंटनेच पालकांकडून रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने १३ लाख ६५ हजार रुपये घेतले .

Podar International School : ‘आरटीई’ प्रवेशातून ५३ पालकांची फसवणूक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) (Right to Education Act- RTE) प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५३ पालकांची लाखो रुपयांची फसवणूक (fraud) झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे .आरटीईतून प्रवेश (rte admission) मिळावा यासाठी पालकांची सर्वाधिक पसंती असलेल्या वाघोली (Wagholi) परिसरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये (Podar International School) हा धक्कादायक प्रकार घडला आहे.शाळेच्या अकाउंटंटनेच -(लेखापाल) (school accountant) ही फसवणूक केल्याचे समोर आल्याने एकाच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी लेखापालाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : CBSE बोर्ड परीक्षेच्या निकालात बदल ; आता ओवरऑल डिवीजन / डिस्टिंक्शन नाही

विनयकुमार रुपचंद भांडारकर (सध्या रा. मांजरी, मूळ रा. भंडारा)असे गुन्हा दाखल केलेल्या लेखापालाचे नाव आहे.  आहे. वाघोलीतील उबाळे नगर परिसरात पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे .आरोपी भांडारकर शाळेत लेखापाल आहे.शाळेचे सहायक व्यवस्थापक स्वानंद चंद्रकांत कुलकर्णी (वय ४७, रा.वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.  ‘आरटीई’अंतर्गत ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अनेक वेळा मुलांना घरापासून जवळ असलेली शाळा मिळत नाही.त्यामुळे अनेक पालक अशा अमिषयांना बळी पडतात.

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये  आरटीई अंतर्गत आपल्या मुलंला प्रवेश मिळावा यासाठी अनेक पालक प्रयत्न करतात.मात्र,आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते.त्यामुळे आरटीईतून  प्रवेश मिळवून देतो असे म्हणणाऱ्याच्या आमिषाला बळी पडू नका,असे आवाहन शिक्षण विभागाकडून गेल्या काही वर्षापासून केले जात आहे.तसेच याप्रकरणी शिक्षण विभागाने कारवाई सुध्दा केली आहे.तरीही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.परंतु, मुलांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी काही पालक लाखों रुपये मोजत असल्याने प्रवेश प्रक्रिया अधिक कडक आणि पारदर्शकपणे राबवणे गरजेचे आहे.

आरोपी भांडारकर याने अनेक पालकांना ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्याने शहरातील ५३ पालकांकडून रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने १३ लाख ६५ हजार रुपये घेतले होते. पालकांनी एप्रिल महिन्यात पैसे दिले होते. त्यानंतर प्रवेश न मिळाल्याने पालकांनी भांडारकर याच्याकडे विचारणा केली. पालकांनी याबाबत शाळेच्या प्रशासनाकडे तक्रार दिली.त्यानंतर शाळेने पोलिसांकडे तक्रार दिली.