संस्कृत एकांकीका स्पर्धेत डेक्कन कॉलेजची बाजी ; एस. पी. कॉलेजने मिळवले उत्तेजनार्थ पारितोषिक

प्रसिद्ध संस्कृत विद्वान  डॉ. रा.ना.दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या २२ वर्षांहून अधिक काळापासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेमध्ये  फर्ग्युसन महाविद्यालय, एस.पी.महाविद्यालय,डेक्कन महाविद्यालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ , हं.प्रा. ठा.  महाविद्यालय.अमेरिकन इन्स्टिट्युट आदी महाविद्यालयांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.

संस्कृत एकांकीका स्पर्धेत डेक्कन कॉलेजची बाजी ; एस. पी. कॉलेजने मिळवले उत्तेजनार्थ पारितोषिक
फर्ग्युसन महाविद्यालयाच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या डॉ. रा.ना.दांडेकर संस्कृत एकांकीका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी जल्लोष करताना विद्यार्थी 

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या Fergusson College संस्कृत विभागातर्फे अंफिथिएटर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या डॉ. रा.ना.दांडेकर संस्कृत एकांकीका स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक डेक्कन कॉलेजच्या Deccan College ' मरुत्सखा ' या एकांकिकेने , द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ pue university यांच्या 'श्रीभरतेश्वरबाहुबलिकथा' नाट्याने तर अमेरिकन इन्स्टिट्युटच्या दोन विदेशी विद्यार्थी यांच्या ' सा सुमरमणी ' या एकांकीकेला तृतीय पारितोषिक मिळाले आहे. सांघिक उत्तेजनर्थ पारितोषिक स.प  महाविद्यालय s p college अन्वीक्षा या नाट्याला देण्यात आले.  

 प्रसिद्ध संस्कृत विद्वान  डॉ. रा.ना.दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या २२ वर्षांहून अधिक काळापासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेमध्ये  फर्ग्युसन महाविद्यालय, एस.पी.महाविद्यालय,डेक्कन महाविद्यालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ , हं.प्रा. ठा.  महाविद्यालय.अमेरिकन इन्स्टिट्युट आदी महाविद्यालयांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेत अमेरीकन इन्स्टिट्युट च्या कॅरोल रॉड्रिग्ज हिला विशेष लक्षवेधी अभिनय,असे पारितोषिक मिळाले.

    फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ..रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते सकाळी स्पर्धेचे उद्घाटन झाले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यावेळी उपस्थित होते. डॉ. गौरी मोघे , अमोघ प्रभुदेसाई, तन्मय भोळे परीक्षक म्हणून काम पाहिले. संस्कृत नाटके अजून प्रगत होण्याच्या दृष्टीने भविष्यात कार्यशाळा आयोजित करण्याचे संस्कृत विभागाचे प्रमुख अंकित रावल यांनी जाहीर केले.

 

वैयक्तिक पारितोषिके पुढील प्रमाणे  :

स्त्री अभिनय -

मल्लिका -  Shuheng Zhang ,अमेरिकन इन्टिट्युट (प्रथम )

लक्ष्मीबाई तळपदे - आदिती सरदेसाई,डेक्कन काॕलेज ( द्वितीय )

प्रतिभा / युवती - श्रूती कार्लेकर,फर्ग्युसन महाविद्यालय ( तृतिय )

 

पुरुष अभिनय -

लेले - तेजस साने,फर्ग्युसन महाविद्यालय ( प्रथम )

राजाभाऊ - गौरव चितळे,टिळक महाराष्ट्रात विद्यालय ( द्वितीय )

शिवरूर तळपदे - सौमित्र मांडके, डेक्कन महाविद्यालय ( तृतिय )

दिग्दर्शन -

कल्याणी भोयर ,  डेक्कन महाविद्यालय ( प्रथम )

Shuheng Zhang  , अमेरिकन इन्स्टिट्युट ( द्वितीय )

साज जोशी,शताक्षी पंडीत , स. प. महाविद्यालय ( तृतिय )

 

लेखन पारितोषिक  -

आराध्या गौरव,देवेश शहा - पुणे विद्यापिठ

 

विशेष पारितोषिक

संगीत : सहदेव जोशी , किर्तेश बाविस्कर , प्रथमेश बिवलकर (पुणे विद्यापीठ)