कॉमिक बुकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आरोग्य, नागरी मूल्ये, लैंगिक समानतेचे धडे

आयुष्यमान भारत अंतर्गत शालेय आरोग्य आणि निरोगीपणा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पूरक आणि परस्परसंवादी आणि शैक्षणिक साधन म्हणून त्याची रचना करण्यात आली आहे.

कॉमिक बुकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आरोग्य, नागरी मूल्ये, लैंगिक समानतेचे धडे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशभरातील शालेय विद्यार्थांना (School Students) त्यांच्या आवडीचे कॅरेक्टर्स  कॉमिक बुकच्या (Comic Book) माध्यमातून आरोग्य, भावनिक कल्याण, मानसिक आरोग्य, परस्पर संबंध आदींचा  देणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि युनेस्कोने 'लेट्स मूव्ह फॉरवर्ड' (Lets move forward) हे कॉमिक बुक लॉन्च केले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कॉमिक बुक मध्ये आरोग्य, भावनिक कल्याण, मानसिक आरोग्य, परस्पर संबंध, नागरी मूल्ये, लैंगिक समानता, पोषण, स्वच्छता, मादक द्रव्यांचा गैरवापर प्रतिबंध, आकर्षक कथन आणि आकर्षक पात्रांद्वारे निरोगी जीवनशैली अशा अनेक विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

सावधान : परीक्षा अन् गुणांच्या जीवघेण्या 'स्पर्धेत' तुमचाही पाल्य अडकतोय का?

आयुष्यमान भारत अंतर्गत शालेय आरोग्य आणि निरोगीपणा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पूरक आणि परस्परसंवादी आणि शैक्षणिक साधन म्हणून त्याची रचना करण्यात आली आहे. या पुस्तकात वेगवेगळ्या ११ विषयांवर भर देण्यात आला आहे.

या पुस्तकात मनोरंजक पद्धतीने कथा स्वरूपात विविध पात्र विद्यार्थ्यांना आरोग्य, भावनिक कल्याण, मानसिक आरोग्य, परस्पर संबंध, नागरी मूल्ये, लैंगिक समानता, पोषण, स्वच्छता, मादक द्रव्यांचा गैरवापर प्रतिबंध आदी विषयांवर धडा देतील. 

भविष्यात युनेस्कोच्या मदतीने आणखी कॉमिक बुक तयार करण्यात येणार आहेत, याचा उपयोग फक्त भारतीय विद्यार्थ्यांनाच नव्हे तर परदेशातील विद्यार्थ्यांना व्हावा, या दृष्टीने हे पुस्तक तयार करण्यात येत आहे, अशी माहिती प्रधान यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo